Sant Santaji Maharaj Jagnade
वर्धा: महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेची राज्य कार्यकारणी मिटिंग वर्धा येथे दि. २६ जानेवारी रविवारी रोजी सेवाग्राम येथील बापू कुटी मध्ये खा.रामदासजी तडस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला व युवा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
आपल्या देशाने अधिकृतपणे जागतिकीकरणाचा स्वीकार केला. जागतिकीकरण एकटे आले नाही. त्याच्याबरोबर खाजगीकरण आणि उदारीकरण आले. ही खाउजा संस्कृती म्हणजे जगभरातल्या भांडवलदारांसाठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध होणे. करार-मदार करून हे झाले आणि आपल्या देशात एक बाजाराधिष्ठित संस्कृती उदयाला आली. प्रत्येक गोष्ट बाजारीकरणाच्या दृष्टीने पाडली जाऊ लागली. प्रत्येक गोष्ट विकावू झाली.
श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव दाभाडे शहर तेली समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले सकाळी 7.00 वा. श्री. संताजी महाराज प्रतिमा व गाथा पूजन विठ्ठल मंदिर तळेगाव दाभाडे येथे श्री. संजय कसाबी यांच्या हस्ते. सकाळी 8.30 वा. प्रतिमा पूजन मारुती मंदिर येथे.
पुणे - मावळ तालुक्यातील तेली समाज बांधवांनी तालुक्यातील तेली समाज्याच्या ज्या समाजबांधवांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाली आहे. अश्या पाटलांच्या सत्कार करण्यात आला.
संजय येरणे लिखित बहुचर्चीत गाजलेली संताजी चरित्रमय ऐतिहासिक सामाजिक जगामध्ये सर्वप्रथम साकार झालेल्या कादंबरीस यंदाचा रसिकराज साहित्य मराठी वाड्.मय राज्यस्तरीय पुरस्कार माजी कुलगुरु डाँ शरद निंबाळकर यांचे हस्ते व डाँ बळवंत भोयर संस्थापक अध्यक्ष यांचे संयोजनातून प्रदान करण्यात आला.