Sant Santaji Maharaj Jagnade
अकोला - दि २९/०१/२०१८ रोजी संताजी सेना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा संताजी सेना अकोला जिल्हाअध्यक्ष मा. श्री. प्रमोददादा देंडवे यांना तेली समाज भुषण पुरस्कार देण्यात आला स्वराज्य भवन अकोला येथे ओबीसी महासंघ अकोला द्वारा आयोजित ओबीसी मेळावा व समाज भूषण पुरस्कार सोहळा २०१८
रत्नागिरी तेली समाज उन्नती संघ चिपळूण व गुहागर यांस तर्फे मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2018 रोजी महाशिवरात्रि स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर संमेलन हे विजय कृष्णाजी रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तर समान्य विशेष प्रमुख अतिथी श्रीमान शरद सुभाष तेली, उपनगराध्यक्ष बदलापूर असतील.
अकोला तेली समाज : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील ५-६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाच्या नराधमांना पाठीशी घालण्याची भूमिका संस्थाध्यक्षांनी घेतली आहे. आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल करून अटक न झाल्यास महाराष्ट्र तैलिक महासभेच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकान्यांना निवेदनातून देण्यात आला.
मुर्तिजापूर तेली समाज : धुळे जिल्ह्यातील दौंडाईचा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा येथील संताजी सेना व तेली समाज मुर्तिजापूरच्या वतीने निषेध करण्यात येवून अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यवतमाळ दि 22 फेब्रुवारी 2018 रोजी वणी येथे वणी तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा जि. धुळे येथे 8 फेब्रुवारी रोजी एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला.त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा