मुदखेड, दि. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासन परिपत्रकानूसार शहरातील मुदखेड तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये
साजरी करण्यात आली. येथील तहसीलदार सुजीत नरहारे यांच्या सूचनेनुसार तहसील कार्यालयात सकाळी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक जनार्दन पिन्नलवार यांच्या हस्ते करण्यात आले.
आरमोरी, - राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 26 डिसेंबर 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती 8 डिसेंबर रोजी साजरी करण्याकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जामनेर: शहरातील कमल हॉस्पिटल येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
जवळे : श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९८व्या जयंती जवळे (ता. पारनेर) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय, धर्मनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात तिळवण तेली समाज व विद्यालयाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले. जवळे ग्रामपंचायत कार्यालयातही जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच गोरख शिवाजी पठारे,
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात झाली. सातारा येथील काँग्रेस भवन येथे सुभाष हाडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.