धुळे - संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबरला जयंती व १ जानेवारीला पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गुरु-शिष्य स्मारक परिसरातील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी तेली समाज मंडळाने केली आहे. याविषयी महापौर प्रदीप कर्पे यांना निवेदन देण्यात आले.
श्री संताजी महाराज सेवाभावी संस्था देऊळगावराजा अंतर्गत, तेली समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा बुलढाणा, श्री संत नगरी शेगांव, जि. बुलढाणा,
रविवार, दिनांक : १६ जानेवारी २०२२ • वेळ : सकाळी १० ते ४ • मेळाव्याचे ठिकाण : पांडूरंग कृपा, कुणबी समाज भवन, शेगांव
जय संताजी प्रतिष्ठाण, बीड जिल्हा आयोजित तेली समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय तैलिक साहू महासभा, नवी दिल्ली तथा समाजभूषण आदरणीय ना.जयदत्तजी (आण्णासाहेब) क्षीरसागर यांच्या शुभहस्ते आज बीड येथे स्व. सोनाजीराव (नाना) क्षीरसागर या ठिकाणी संपन्न झाला.
अहमदनगर - युवा पिढीने समाजसेवेचे व देशसेवेचे कार्य करून भारत देशाला बळकटी देण्याचे कार्य करावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीचे कार्य युवाशक्तीने हाती घ्यावे. देशाच्या विकासात युवाशक्तीचे मोलाचे योगदान आहे.
नगर - महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ साली काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत शासनाने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे, त्याचे पालन व्हावे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन नाशिक-अहमदनगर विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे.