दि. 8 :- राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांची 397 वी जयंती ग्रा. प. कार्यालय गुंधा येथे साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विठ्ठलराव कालदाते तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्षमनराव भुजबळ, चिंतामनराव नव्हाळे,गोविंद राऊत सर,नंदुजी इंगळे, गजाननराव माने, किसनराव चिलपे, दिपकजी मानवत्कार, जयदेव तिरके व गावकरी मंडळी उपस्तित होते.
तेली समाज गडचिरोली, येवली परिसरातील तेली समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा 'जन्मोत्सव कार्यक्रम' बुधवार दि. ०८/१२/२०२१ ला संपन्न होत आहे. महाराष्ट्राला संत परंपरेचा एक मोठा इतिहास आहे. या संतांनी तत्कालीन अनिष्ठ रूढी, वाईट परंपरा व अंधश्रध्देवर फार मोठे कोरडे ओढले आणि समाजाला त्यातून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला. परंतु समाजाला कायम अंधश्रेध्दत ठेऊ इच्छिणाऱ्या प्रस्थापित वर्गाला हे खटकणारे असल्याने त्यांनी संताचा सुध्दा फार मोठा छळ केला.
साकुरी : शिर्डी शहर तेली समाजाच्या वतीने शिर्डी येथे तेली समाज बांधवांची बैठक पार पडली. त्यात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.यात प्रामुख्याने श्री संताजी महाराज जगनाडे जयंती नगरपंचायत शिर्डी येथे साजरा करण्यात येणार आहे. तसेच तेली समाज संघटनच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी दीपक चौधरी तर शिर्डी शहर कार्याध्यक्षपदी सोमनाथ महाले यांची निवड करण्यात आली आहे.
सोनगांव ता. राहुरी येथील शुभम अनिल भोत यांची भाजपा ओबीसी युवा मोर्चा च्या अहमदनगर जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. सुभाष घाटे यांच्या नेतृत्वात सामाजिक क्षेञात काम करत असताना भाजपा नेतृत्वाने शुभम भोत यांची पक्षनिष्ठा पाहता त्यांना पक्षाची जबाबदारी दिली.यानिवडीबद्दल मा. ऊर्जामंञी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, सुभाष घाटे यांच्या मार्गदर्शनात
धुळे - संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबरला जयंती व १ जानेवारीला पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गुरु-शिष्य स्मारक परिसरातील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी तेली समाज मंडळाने केली आहे. याविषयी महापौर प्रदीप कर्पे यांना निवेदन देण्यात आले.