चांदवड - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. संगीता बाफना यांनी पुष्पहार अर्पण केला. उपप्राचार्य संदिप समदडिया यांनी प्रास्ताविक केले तर उपशिक्षक ए. यू. सोनवणे यांनी मनोगतातून संत जगनाडे महाराज यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे अभंगाचे लेखक व आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती समस्त तेली समाज ,राजगुरूनगर यांचे वतीने साजरी करण्यात आली . बुधवार दि ०८/१२/२०२१ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत तिळवण तेली समाज कार्यालयाचे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संताजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा झाला.
श्री संत संताजी महाराज यांची जयंती बरबडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. संताजी महाराज हे कुशल असणारे शिष्य होते. त्यांनी समाज परिवर्तनाचे काम केले. यांच्या जीवनावर सरपंच माधव कोलगाणे, प्रल्हाद जेटेवाड, शंकर बनसोडे यांनी थोडक्यात प्रकाश टाकला. आणि यावेळी या समाजासाठी मंदिर बांधून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे सरपंचांनी सांगितले.
मुदखेड नगर परिषद कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. तेली समाज बांधवांचे दैवत असलेले संत संताजी जगनाडे महाराज यांची दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शासन परिपत्रक नुसार मुदखेड नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांच्या उपस्थित पालिका सभागृहात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
अकोला :- महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुख्य कार्यालय राजेश्वर कॉन्व्हेंट येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विष्णुजी पंत मेहरे जिल्हा अध्यक्ष दीपक इचे कार्य अध्यक्ष डॉक्टर धनंजय ऊर्फ बाबा नालट युवक आघाडीचे अध्यक्ष संजय जसंपुरे प्रमोद चोपडे अनंत साखरकार विकास राठोड वैभव मेहरे