रा. तेली युवा सेना महाराष्ट्र अंतर्गत श्री संताजी महाराज वधु-वर मेळावा समिती आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा - २०२३ तेली समाज भुषण पुरस्कार व आदर्श माता सन्मान सोहळा रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत मेळाव्याचे ठिकाण: श्री संताजी जगनाडे महाराज तेली संस्था श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे परिचय पुस्तिकेसाठी वधु - वराची माहिती.
चंद्रपूर तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रविवार दि. ८ जानेवारी २०२२ ला सकाळी ११:०० वाजता मातोश्री सभागृह खनके वाडी ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे भव्य उपवधू उपवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. समाजातील गरीब व होतकरू मुला-मुलींना योग्य स्थळ शोधण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो.
खेडगाव दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे श्री संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संताजी युवक प्रतिष्ठान व संताजी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक सुरेश सोनवणे, रमाकांत सोनवणे
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव सोहळा सन २०२२ औरंगाबाद येथे बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते ३ वा. आपण साजरा करित आहोत यांचे जीवनचरित्र आपल्या सर्वांपर्यंत पोहचविण्याच्या हेतुने व त्यांच्या विषयी कृतज्ञता आपल्या सर्वांपर्यंत यासाठी आपण सहकुटूंब उपस्थित रहावे ही विनंती करण्यात आली आहे.
संताजी कल्याणकारी मंडळ व संताजी ब्रिगेड तेली समाज महासभे तर्फे संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप, कार्यक्रम व समाज प्रबोधनाचा भव्य कार्यक्रम भगवती सभागृह त्रिमूर्ती नगर या ठिकाणी संपन्न झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री रमेश जी गिरडे, (अध्यक्ष ) जवाहर विद्यार्थी गृह हे होते.