दि. ८ पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उस्मानाबादः संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती गुरुवारी (दि.८) जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. उस्मानाबाद शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरील संताजी जगनाडे महाराज चौकात जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे आ. कैलास पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,
नगर महाराष्ट्राला अनेक संतांची मोठी परंपरा आहे, या संतांनी आपल्या त्यागातून समाजाला जागृत करून दिशा देण्याचे काम केले आहे. संत संताजी महाराजांनी आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत समाजोन्नत्तीचे काम केले त्यांचे विचार आणि कार्य आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार जीवनात प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे.
नगर - संतांचे विचार हे आपले जीवन सुखी करण्यासाठी आहेत. त्यांचे विचार आचरणात आणून आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्वावर तिळवण तेली समाज ट्रस्ट काम करुन समाजोन्नत्ती करत आहे.
श्री संत संताजी महाराज सभागृह खामगांव भव्य सभागृह लोकार्पण सोहळा निमंत्रण खामगांव शहरात श्री संत संताजी महाराज सभागृह किंमत ७२ लक्ष रु. खर्च करुन बांधण्यात आलेल्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. दिनांक: 11 डिसेंबर 2022 वेळ : संध्या ६:०० वा. स्थळ : सिव्हील लाईन, भिसे प्लॉट, खामगांव, जि. बुलडाणा