तेली समाज संस्था, गोंदिया विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा गोंदिया द्वारा आयोजित ३९८ वी श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम गुरुवार, दि. ८ डिसेम्बर २०२२. स्थळ : श्री संत संताजी जगनाडे सांस्कृतिक भवन, मेघनाथ साहा नगर, पिंडकेपार रोड, गोंदिया प्रमुख पाहुणे : मा. श्री शेषरावजी गिऱ्हेपुंजे : कार्यक्रमाचे अध्यक्ष
तिळवण तेली समाज तळेगाव दाभाडे शनी मारुती मंदिर येथे " श्री संत संताजी जगनाडे " महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी पुणे शहराचे विश्वस्त श्री प्रवीण शेठ बारमुख व तळेगाव शहराचे विश्वस्त देवेंद्र बारमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी तळेगाव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते
राजगुरूनगर येथे तेली समाज कार्यालयात गुरुवार दिनांक 08/12/2022 रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराजांची 398 वी जयंती साजरी करण्यात आली, संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, आपल्या भाषणात जयप्रकाश कहाणे, माजी चिटणीस तेली समाज राजगुरूनगर, सोमनाथ कहाणे, उपाध्यक्ष, तेली समाज, राजगुरूनगर, प्रदीप कर्पे, विभागीय सचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा
अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने निमगाव केतकी या ठिकाणी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आखिल तेली समाज संघटनेच्या वतीने निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशन येथे जयंती साजरी करण्यात आली
थोर संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार आदरणीय श्री. हरिभाऊजी बागडे नाना, नगराध्यक्ष श्री.सुहासभाऊ शिरसाठ व भाजपा शहराध्यक्ष श्री.योगेश मिसाळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तैलिक महासंघाचे शहराध्यक्ष श्री.सुरेश मिसाळ, तैलिक महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष श्री.वैभव दुतोंडे व शहराध्यक्ष श्री.अक्षय पाडळकर, उपनगराध्यक्ष श्री.अकबर पटेल, नगरसेवक श्री.शेखर पालकर