श्री संत संताजी महाराज सभागृह खामगांव भव्य सभागृह लोकार्पण सोहळा निमंत्रण खामगांव शहरात श्री संत संताजी महाराज सभागृह किंमत ७२ लक्ष रु. खर्च करुन बांधण्यात आलेल्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. दिनांक: 11 डिसेंबर 2022 वेळ : संध्या ६:०० वा. स्थळ : सिव्हील लाईन, भिसे प्लॉट, खामगांव, जि. बुलडाणा
रसुलाबाद : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवार, ८ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून जयंती साजरी करण्यात आली.
कन्नड : कन्नड येथे संताजी महाराजांची ३९९ वी जयंती शिवना नदी तीरावरील महादेव मंदिर परिसरात प्रदेश तेली महासंघ, संताजी महाराज ट्रस्ट व तिळवण तेली समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
चोपडा तेली समाजाची संस्था श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा व चोपडा तालुका महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा, संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा चोपडा अशा विविध संस्थांच्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.
फुलंब्री, ता. ८ : येथे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती साजरी करण्यात आली. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, भाजप शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तैलिक महासंघाचे शहराध्यक्ष सुरेश मिसाळ, तैलिक महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष वैभव दुतोंडे,