Sant Santaji Maharaj Jagnade
या परिसराचे वैशिष्ठ असे की दोन्ही शाखेत एक समान दुवा आहे. या परिसरात जन्मा पासुन मरे पर्यंतु जे विधी होतात हे सर्व विधी ब्राह्मणा द्वारे नव्हे तर जंगम कडून आज ही होतो. ब्राह्मणाने केलेले विधी मान्य नाहीत. जेंव्हा हा या परिसरात तेल गाळप ही प्रक्रिया बैलघाण्याद्वारे होत होती. तेव्हा प्रत्येक सोमवारी घाणा बंद आसे. महादेव हाया परिसराचा सर्वश्रेष्ठ देव. यातुन एकस्पष्ट शैवपंथ वैष्णव सरळ सरळ भेद होते. या मध्ये हा परिसर शैव पंथ अभिमानाने संभाळत होता. भस्म हे त्याचे प्रतिक आज ही या परिसराची साठवण आहे.
तेली गल्ली (गावकूसचे) सुरवातीचे दिवस होते. कुठेच धागेदोने नव्हते ते गोळा करून गुंफायचे होेते समाज संघटनाला एक दिशा द्यावयाची होती. आशा वेळी श्री. बंडोपंत गेनबा शेलार यांची ओळख झाली आणी एक भक्कम धागा सापडला आगदी पुर्वीच्या संघर्षाच्या काळात त्यांनी सहकार्य व विश्वास दिला जीवनाची सुरवात निमशासकीय नोकरी करीत सुरू केली परस्थीतीची जान होती समाज विचाराची प्रक्रिया होती. जमेल ते करण्याची तयारी होती. यातुनच ते धडपडत होते. श्री. संताजी पालखीला आपल्या वडीलांनी पहिला मदतीचा हात दिला. एका बैलाच्या छकड्यात पालखी ठेऊन श्री. संत संताजी महाराजांना पंढरपूरात घेऊन जात होते.
सन 1900 च्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्या मधील कै. अंबाजी क्षिरसागर यांनी कुटूंबच बैलगाडीत बसवले. करडीच्या शोधात होते. करडी असेल तर तेलघाना चालेल तो चालला तर घर चालेल. सांगली मिरज करीत ते अथनी येथे गेले. या अथनीत काही काळ घाना सुर ठेवला. इथे ही निट जम बसेना. ओळखी पाळखी काढत हुबळी येथे पोहचले.
सातारा लगत असलेल्या भोर शहरातुन वडील पुण्यात आले शुन्यात उभे राहिले. या वेळी कै. माधवराव धोत्रे बांधकाम क्षेत्रात शिरले आगदी या क्षेत्रात एक कामगार म्हणुन उभे राहिले. पुणे शहर व डेक्कन परिसरात ते उत्कष्ट बाधकाम करणारे परिचीत झाले. त्यांच्या कामाची जाणीव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पर्यंत गेली. त्यांनी त्यांना कर्हाड येथे नेहले.
पण विचाराची बैठक पक्की वृत्ती धार्मिक बरड गाव पंढरीच्या वाटेवर असलेले त्यामुळे दोन वेळेच्या जेवणाला सोबत वारकर्याची असावी. ही इच्छा तसे वारकरी भेटत, जर नाहीच भेटले तर त्यांचा शिधा काढुन प्रथम ठेवत. आळंदीं त पंढरपुर मार्गावर आषाढी व कार्तीक वारीला वारकरी याच बरड गावातुन जातात. या मार्गावर बरड येथे मुक्काम पालखीचा आसतो अर्जुनशेठ यांनी आपल्या जीवनभर पालखीच्या मुक्कामा दिवशी पुर्ण पालखीलाच पोटभर जेवन दिले. हिंदु धर्मावर त्यांची निष्ठा त्यामुळे हिंदु धर्माचे शंकराचार्य ही त्यांची नोंद ठेवत असत नव्हे तर प्रत्यक्ष दौर्यात भेटत असत.