Sant Santaji Maharaj Jagnade
सासवडच्या एस.टी.स्टँड समोर श्री. दत्त स्विट मार्ट होलसेल साठी गर्दीचा महापुर आसतो. 3/4 जन माल देत आसतात तर डोक्यावर टोपी लेंगा शर्ट घातलेले श्री. दत्तात्रय मारती क्षिरसागर हासत हासत गल्यावर हिशोब करित असणार. आशा या गर्दीत समाजाचे वधुवर मेळावे वाले समाजाचे मंदिर उभारणार पालखी सोहळावाले, मासिकवाले येणार. या येणार्या बांधवांना क्षिरसागर परत पाठवणार नाहीत आगदी अपेक्षा समजुन घेऊन ती पुर्ण करणार पण परत पाठविणार नाहीत. ही येणार्या बांधवांची खात्री म्हणजे श्री क्षीरसागर स्वत: विषयी प्रसिद्धी स्वत:चे नाव ही नाही फोटो तर दुरच फक्त हवे स्वीट मार्टचे नाव.
शिक्षण आहे, नोकरी नाही, खिशात पैसा नाही म्हणुन व्यवसाय नाही म्हणुन पैसा नाही हे रडगाणे गात बसण्यापेक्षा आपण यावर ही यश कमवु शकतो हे राहुरी जि. नगर येथील श्री. संजय विठ्ठल पन्हाळे यांनी सिद्ध केले आहे. वडिल विठ्ठल पन्हाळे हे संगमनेर येथे उमेदीच्या काळात ओल्या, भाजक्या शेंगाची गाडी लावत होते. ही गाडी लावता लावता भाजीपाला विक्री करू लागले. यातुनच गावकामगार तलाठ्याची नोकरी लागली.
समाजाच्या नेत्यांची एक पद्धत ठरली आहे. ज्याच्याकडे चार चाकी गाडी आहे. ज्याची गावात शहरात प्रतिष्ठा आहे. ज्याच्याकडे चार प्रतिष्ठीत नातलंगांची साठवण आहे. ज्याला या सोबत वेळ आहे. असा समाज बांधव समाज संस्थेचा अध्यक्ष असु शकतो असा साठवण असलेला बांधव समाज संघटनेत मानासाठी निवडला जातो. या सर्व प्रक्रिया निदान राहुरी शहरात बगल देऊन ज्याच्या जवळ समाज निष्ठा आहे. आशा बांधवालाच तेली महासभेचे अध्यक्ष पद देण्यात आले. यांची सार्थ निवड ही त्यांनी बर्याच बाबत सार्थक लावली हे श्री. दत्तात्रय नरसिंह सोनवणे यांनी सिद्ध केले आहे.
आई भल्या पहाटे उठुन भाकरी तयार करून फडक्यात बांधुन एसटीने पाठवुन देत आसे. तो डबा घेऊन येत आसत. सकाळी तोच डबा रात्री सकाळचे शिळे खाऊन गाडीत झोपत आसत. या अवस्थेत गॅरेज मधील कामाचा पुर्ण अनुभव घेतला. हाताला कला आली. याच कलेच्या जोरावर टाटा टेल्को, बजाज टेम्पो, बजाज ऑटो, भारत फोर्ज, सिपोरेक्स (बी.जी. शिर्के) या मध्ये मॅकॉनिक म्हणुन थोडे थोडे दिवस काम केले. आणि कामाचे खरे कौतुक मे. बी. जी. शिर्के कंपनीने सैदि अरेबिया येथे पाठविले
यातुन पुन्हा व्यवसाय उभा करू लागले. छापाई कामा बरोबरच झेरॉक्स कामाला घरची माणसे कमी पडू लागली ज्या जागेवर व्यवसाय सुर केला तीच मोक्याची जागा खरेदी केली. बदलते तंत्रज्ञान आत्मसाथ केले तर व्यवसाय होऊ शकतो त्या तंत्रज्ञानाला आर्थिक पाठबळ ही जवळ ठेवावे लागते. हे गणित जमले तरच व्यवसाय आपला रहातो हे शेडगे यांनी सिद्ध केले. त्यामुळे पौड सारख्या तालुक्याच्या पण खेडेगावात फेलेक्स मशिन सुरू केली. या क्षेत्रात ही आपला जम बसवला. हा जम बसवताना स्वत:पुरते न पहाता या व्यवसायाशी संबंधीत बांधवांना ही उभे केले.