Sant Santaji Maharaj Jagnade
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (2)
विदर्भ तेली संघर्ष समितीचे प्रमुख मधुकर वाघमारे यांनी ४ पानी पत्रक तेली समाजाच्या राजकीय मंडळींना दिले. तसेच प्रसिद्धीस ही दिले. पण समाजाच्या खासदार, आमदार व राजकीय क्षेत्रातील मंडळींना साधी या पत्राची दखल ही घ्यावी वाटली नाही. तेली समाजाचे नाव पाहिजे. तेली समाजाची मते पाहिजेत. पण समाजाच्या हिताचा विचार येताच आपली सोय पाहिली जाते. परवा बिड मधील बातमी वार्या सारखी पसरली काही हौश्यांनी समाज पातळीवर आपल्या समाज निष्ठेचे प्रदर्शन ही भरवले.
महाराष्ट्रातील अनेक ओ.बी.सी. संघटना व कार्यकर्त्यानी आमदार श्री. जयदत्त क्षिरसागर यांचे आभार मानले होते. झुंडशाहीने मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास जो दबाव गट निर्माण केला होता त्यातील आमदार श्री. विनायक मेटे यांचा लोकशाही मार्गाने त्यांनी त्यांचा पराभव केला होता.
ह.भ.प. दहितुले बुवा मानव म्हणुन जगले. चार रूपये कमवुन देान रूपये इतरा साठी देत होते. अनेक गोर गरिब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत त्यांनी केली. अनेक मंदिरांना त्यांनी साह्य केले. मंदिरात मुर्ती दिल्या. गरिबांची लग्ने लावून दिली अडचनीत आलेल्या संसाराला हातभार लावला पंढरपूर येथे पालखी सोहळ्यास १४ गुंठे जागा घेण्या साठी उसनवार पैसेे दिले. पंढरपुर येथे संताजी मंदिर ही उभे केले. संत संताजी जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे ते काही वर्ष अध्यक्ष ही होते. गाणगापूर येथे जावून त्यांनी आश्रमाची उभारणी केली.
थोड्याच काळात ते संताजी मय झाले घरी आल्यावर, तुकोबांची गाथा ज्ञानेश्वरी सुनाकडून वाचुन घेऊ लागले. हरीपाठ वाचून घेता घेता पाठ करू या ही पेक्षा ते संताजी मय झाले. यातूनच एक विचार जोपासला ते रहात असलेला परिसर पुण्या लगत परंतू तसा माळरानाचा. आपली भरपूर जागा व शेती. या परिसरात संताजी मंदिर बांधवयाचे व परिसराला संताजी नगर नाव द्यावयाचे. हा विचार घरात सांगीतला सांगताना हे ही सांगीतले मी कष्ट करेल त्या कष्टातून मंदिर उभे करेल.
पुस्तकी ज्ञानाच्या पदव्या देणारी अनेक विद्यापीठ आहेत. या पदव्या मुळे मान सन्मान मिळतो. नोकरी ही मिळते. ही वास्तवता आसते. या पदव्या पेक्षा ही माणूस वाचण्याची माणुस समजुन घेण्याची माणुसकी जपण्याची रोजची भाकर मिळवण्याची घराला घरपण देणारी जी पदवी आसते. ती पुस्तकांच्या अभ्यासातून मिळेलच असे नाही. इथे शिक्षक आपणच आसतो. इथे प्रश्नकर्ते व उत्तरकर्ते आपणच आसतो. इथे मिळालेल्या पदवीतून रोजची भाकर मिळते. ही कष्टाची भाकर शांत झोपू देते. ही कष्टाची भाकर जीवन घडवू शकते. याचा जीवंत पणा परवा पुण्याच्या डेक्कन जीमखान्यावरील श्री. प्रविण गोपाळ येवले यांच्याकडे गेल्या नंतर आला.