Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
संताजी सेवा प्रतिष्ठाण आयोजित वधु वर मेळावा
![]()
तेली समाजाची वधुवर पुस्तीका 2014
तेली गल्ली ह्या तेली समाजाची वधु - वर पुस्तीका तेली समाजाच्या हाजारो वधु - वरांची माहिती.
Teli Samaj Pune Vadhu Var Melava 2015, Teli gali magizine

वि. ल. भाव्यांनी आगदी ब्राह्मण समाजाचा कडाडून विरोध सहन करून संत संताजींच्या वह्या वरून पहिली संत तुकाराम गाथा मुद्रित केली याची जाणीव समाजाला झाली. आपल्या कडे सर्य आहे. आपल्या या सुर्याला काजवा बनविले आहे. याची जाणीव प्रथम कुणाला झाली असेल तर ती रावसाहेब विठ्ठलशेठ नारायण केदारी यांना मुंबईकर मंडळी ते एकत्र आले आणी सुदूंबरे येथे गेले येथील स्थानीक मंडळींनी पिड्यान पिड्या संभाळलेली दौलत म्हणजे संताजी समाधी या समाधी जवळ जाण्यास वाट नव्हती या परिसरात झाडे वाढलेली होती. रावसाहेब केदारी पहिले पुढे गेले. आणि त्यांच्या हाताने झाडे दुर केली. आणि मोजून २०/२५ बांधवांना साक्षीने पहिली पुण्यतिथी साजरी करणारे रावसाहेब होते.
महाराष्ट्राची धन दौलत भवानी माता संभाळणारे भगत घराणे होते. त्याच घराण्याचे केशवराव वंशज,. ते पुण्याच्या इतिहासातील पहिले तेली नगराध्यक्ष होते ते ही सन १९३५ -३६ साली. केशवराव सामाजीक जाणीव असलेले बांधव होते. रावसाहेब केदारी यांच्या नेतृत्वाखाली सन १९१९ पासून सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराजांची पुण्यतीथी सार्वजनिक रीत्या सुरू होताच त्यात ही ते सामील झाले. कै. आप्पासाहेब भगतांची इच्छा होती. त्यांचे मत होते की आपल्या समाजाला एक विचारांची बैठक आसावी या साठी आपण प्रयत्न करू या त्यांच्या इच्छे खातर कै. अप्पासाहेबांनी भवानी पेठेतील आपली वास्तु समाजाला दिली. ती काही दिवसात समाजाच्या नावे रितसर ही केली.