धुळे - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासमा प्रदेशाध्यक्ष मा. खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात हमाल, शेतमजूर, शेतकरी व गोरगरिख नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच यावेळी मास्क व सॅनिटायझरचे वाटपही गरिब नागरिकांना करण्यात आले.
तेली समाजामध्ये खान्देशात सामाजिक सेवा देणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा लवकरच " समाज सारथी " पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. लवकरच या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल. समाजाच्या तळागाळापर्यंत सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यामध्ये " समाज सारथी " पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल
अमरावती : जयभारत मंगल कार्यालय येथे मराठा-तेली समाज विकास मंडळाद्वारे आयोजित शिक्षकांचे स्नेहसंमेलन नुकताच पार पडले. मराठा-तेली समाजात अनेक शिक्षक असले, तरी त्यांना एकमेकांचा प्रत्यक्ष परीचय नाही. त्यामुळे शिक्षकांचेपण संघटन निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. संजय तिरथकर यांनी केले.
तेली समाजाचे महाराष्ट्राचे नेते मा.अशोककाका व्यवहारे,चांदवड यांनी आज खान्देश तेली समाज मंडळाच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली.त्यांच्या सोबत चांदवड तेली समाज मंडळाचे पंच व पदाधिकारी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने पत्रकार नरेंद्र बारकु चौधरी यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
नागपूर - काँग्रेस नेते व मंत्री विजय वडेट्टीवार आक्रमक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मनात असेल ते रोखठोक बोलणे त्यांना आवडते. शुक्रवारी, नागपुरातील एका कार्यक्रमात वडेट्टीवारांच्या फटकेबाजीने हास्याचे षटकार उडाले. वडेट्टीवारांबरोबर या वेळी व्यासपीठावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. हीच संधी साधून वडेट्टीवारांनी बावनकुळेंच्या तिकीट कापण्यावरून तुफान टोलेबाजी केली.