दिनांक 3 डिसेंबर रोजी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जी देंडवे साहेब यांच्या आदेशाने संताजी सेना अकोला जिल्हा व संताजी सेना पातूर तहसील कार्यालय येथे तसेच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.श्री.गुल्हाने साहेब यांना संताजी सेना अकोला यांच्या वतीने प्रतिमा तसेच शासकीय जी. आर.देऊन जयंती साजरी करण्यानिमीत्त निवेदन दिले. या प्रसंगी संताजी सेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोजदादा जुमळे,विधी आघाडी अध्यक्ष देवाशिष काकड,
प्रयत्न, निष्ठा प्रामाणिक असेल तर यश हमखास मिळते : अक्षय गुल्हाने यूपीएससी परीक्षेत देशात प्रथम; कोषटवार विद्यालयात सत्कार
पुसद 'प्रयत्न आणि निष्ठा प्रामाणिक असल्यास हमखास यश मिळते. यूपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षामध्ये यश मिळविण्यासाठी योग्य नियोजन, व्यावहारिक नीती कौशल्य व योग्य दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे. ध्यास आणि अभ्यास यातूनच यशोगाथा रचता येते', असे मनोगत यूपीएससी च्या ड्रग्ज इन्स्पेक्टर (मेडिकल डिवाइसेस) या परीक्षेत भारताचा अव्वल आलेल्या अक्षय दिनकर गुल्हाने यांनी व्यक्त केले.
तेली विकास मंच, अकोला सर्व शाखीय तेली समाज वधू - वर परिचय मेळावा, रविवार दि. 22 डिसेंबर 2019 10 ते सायं 4 वाजेपर्यंत, मेळाव्याचे ठिकाण जिल्हा परिषद कर्मचार भवन, सिव्हील लाईन, अकाशवाणी समोर, अकोला , परिचय पुस्तकेसाठी वधु - वरांची माहीती (फार्मची झेरॉक्स चालेल.) 6 डिसेंबर 2019 नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाहीत.
अमरावती तेली समाज श्री संताजी समाज विकास संस्था वधु वर फॉर्म, सदर वधु वर फॉर्म तेली समाजातील वधुवर पालकानी भरून संपर्क कार्यालय डॉ. विजय अजमिरे , मंगल कार्यालय रोड, पवार ड्रायव्हींग जवळ, जोगळेकर प्लॉट, अमरावती येथे पाठवाव अशाी विनंती संस्थे तर्फे करण्यात आलेली आहे.
जय संताजी तेली सामाजिक बहुउद्देशिय संस्था, अमरावती वधु वर फॉर्म, राठोड तेली समाजातील उपवर वधु वरांचे स्थळांची माहिती होण्याचे दृष्टीने वधु वर परिचय पुस्तिका प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. त्या करीता राठोड तेली समाजातील पाल्यांनी आपल्या उपवर वधु किंवा वरांचे नाव पुस्तकांमध्ये नोंदविण्या करीता खाली दिलेल्या नोंदणी फार्म मध्ये नमुद केल्याप्रमाणे फॉर्म खालील पत्त्यावर पाठवण्याची विनंती करण्यात आलेली आहे.