परिस्थितीवर मात करून नेहमी आनंदी रहावे - लक्ष्मीताई महाकाळ
औरंगाबाद, प्रतिनिधी, - जीवन जगतांना अनेक अडचणी संकटे येतात पण खचून न जाता संकटाला धैर्याने समोर जाऊन संकटांवर मात करावी. तेली समाज सेवक श्री महेंद्र महाकाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी त्या बोलत होत्या पुढे बोलतांना त्या म्हणाल्या माणुस छोटा मोठा असे काही नसते जो तो आप आपल्या क्षमतेने परिपूर्ण असतो. तुमच्याकडे किती पैसा किती प्रॉपर्टी आहे याचे कोणाला काही देणे घेणे नसते.
श्री संताजी समाज विकास संस्था अमरावतीच्यावतीने रविवार १५ डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुलामुलीचा परिचय मेळाव्याचे आयोजन व विवाहबंधन या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा खा. नवनित राणा, आ. रवि राणा, रमेशभाऊ गिरडे, माजीमंत्री जगदिश गुप्ता यांच्या उपस्थितीत होत आहे.
श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशिय संस्था, गडचिरोली आयोजीत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हा - गडचिरोली विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा - गडचिरोली संताजी सोशल मंडळ गडचिरोली तेली समाज गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व उप वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. १५ डिसेंबर २०१९ वेळ : सकाळी ११.०० वा. स्थळ : सुप्रभात मंगल कार्यालय, आरमोरी रोड, गडचिरोली
चांदूर बाजार, ११ डिसेंबर - संत परंपरेतील श्रेष्ठ संत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे तैलचित्र सर्वच शासकीय कार्यालयात लावावे, या मागणीचे निवेदन तैलिक समजाच्या शिष्टमंडळाने तहसीदार उमेश खोडके यांना देऊन त्यांना संताजी माहराजांची प्रतिमाही भेट दिली.
भारतातील अन्य राज्यात तिनी समाजाचा समावेश आरक्षणाच्या भटक्या विमुक्त जातीत करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला भटक्या विमुक्त जाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे. या मागणीला घेऊन नागपूर येथील अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र तेली समाजाचे नेते संजय कुंभारकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.