श्री संताजी महाराज जयंती उत्सवाचा पावन पर्वावर संताजी बिग्रेड तेली समाज महासभा महा. राज्य नागपूर यांच्या सहकार्याने आयोजीत भव्य बाईक रॅली व महाप्रसाद रविवार दि.८ डिसेंबर, २०१९ ला सकाळी ९.३० वाजता स्थळ : पारडी हनुमान मंदीर भंडारा रोड, नागपुर. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा श्री संत संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी भव्य बाईक रैलीचे आयोजन पारडी हनमान मंदिर ते ते नंदनवन जगनाडे चौक पर्यंत केले आहे
सर्व तेली समाज बांधवांना सूचित करण्यात येते की श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त दिनाक:-०७-१२-२०१९ सकाळी 11 वाजता महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे तरी सर्व समाज बांधवांनी शिबिराचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती. दिनाक:-०७-१२-२०१९ स्थळ:- तेली समाजाच्या जागेवर हनुमान मंदिर जवळ जुनोणा चौक बाबुपेठ, चंद्रपूर
संताजी सेनेच्या वतीने बोरगाव मंजू येथे संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमा शासकीय कार्यालयांना भेट देण्यात आल्या
दिनांक ०४ डिसेंम्बर रोजी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जी देंडवे साहेब यांच्या आदेशाने संताजी सेना अकोला जिल्हा व तेली समाज नवयुवक मंडळ बोरगाव मंजू द्वारे बोरगाव मंजू येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गवळी साहेब यांना, ग्राम पंचायत चे सरपंच सौ खांडेकर, जि. प.प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका यांना संताजी सेना व तेली समाज नवयुवक मंडळ बोरगाव मंजू यांच्या वतीने प्रतिमा
दिनांक 3 डिसेंबर रोजी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जी देंडवे साहेब यांच्या आदेशाने संताजी सेना अकोला जिल्हा व संताजी सेना पातूर तहसील कार्यालय येथे तसेच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.श्री.गुल्हाने साहेब यांना संताजी सेना अकोला यांच्या वतीने प्रतिमा तसेच शासकीय जी. आर.देऊन जयंती साजरी करण्यानिमीत्त निवेदन दिले. या प्रसंगी संताजी सेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोजदादा जुमळे,विधी आघाडी अध्यक्ष देवाशिष काकड,
प्रयत्न, निष्ठा प्रामाणिक असेल तर यश हमखास मिळते : अक्षय गुल्हाने यूपीएससी परीक्षेत देशात प्रथम; कोषटवार विद्यालयात सत्कार
पुसद 'प्रयत्न आणि निष्ठा प्रामाणिक असल्यास हमखास यश मिळते. यूपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षामध्ये यश मिळविण्यासाठी योग्य नियोजन, व्यावहारिक नीती कौशल्य व योग्य दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे. ध्यास आणि अभ्यास यातूनच यशोगाथा रचता येते', असे मनोगत यूपीएससी च्या ड्रग्ज इन्स्पेक्टर (मेडिकल डिवाइसेस) या परीक्षेत भारताचा अव्वल आलेल्या अक्षय दिनकर गुल्हाने यांनी व्यक्त केले.