Sant Santaji Maharaj Jagnade
भारतातील अन्य राज्यात तिनी समाजाचा समावेश आरक्षणाच्या भटक्या विमुक्त जातीत करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला भटक्या विमुक्त जाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे. या मागणीला घेऊन नागपूर येथील अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र तेली समाजाचे नेते संजय कुंभारकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
तेली समाज नांदेड - नांदेड लोकशाशन नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका येथे तेली समाजाचे आराध्य दैवत तेली समाजाचे कैवारू संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटाने उत्सव साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित. मान्यवर बालाजीराव बनसोडे, तेली समाज जिल्हाध्यक्ष लक्ष्मण क्षीरसागर, जिल्हा सचिव गणेशराव सूर्यवंशी कोषाध्यक्ष नागनाथ चीटकुलवार,
जालना तेली समाज - एक दिवसीय किर्तनमहोत्सव ठेउन श्री संताजी महाराज युवा मित्र मंडळ सामनगाव यांच्या वतिने साजरी करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिति शिव चरित्रकार श्री नितीन महाराज सवडतकर ( आळंदी देवाची ) तेली समाज युवा नेते विकी भैय्या वाघमारे,विलासराव भालेराव, अजय राउत, किरण साखरे, सोपान शिंदे, गणेश भालेराव, केशव मालोदे, रवी भरदम,
देवगाव रंगारी, ता. १० (बातमीदार) : देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील तेली समाजबांधवांतर्फे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवारी (ता. आठ) साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
मुक्ताईनगर : पहिल्या आमदार निधीतुन तेली समाज मंगल कार्यालयाच्या निर्मितीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार तसेच इतर मित्र आमदार यांच्याकडूनही भरीव निधी आणण्यास पुढाकार घेईल, असे आश्वासन आ.चंद्रकांत पाटील यांनी दिले. ते मुक्ताईनगर येथील तेली समाजातर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून सत्कार स्वीकारतांना बोलत होते.