आरमोरी : श्री संताजी जगनाडे महाराज यांची २८३ वी जयंती सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात साजरी करण्यात यावी, असे शासनाने परिपत्रक काढले आहे. संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे.
नांदगांव पेठ- 8 डिसेंबरला संत जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचे शासनाचे आदेश असल्याने सोमवारी अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने नांदगांव पेठ येथील सर्व शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायतला संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
गडचांदूर (ता.प्र.) - गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक संताजी जगनाडे महाराज चौकात प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोकराव बावणे यांनी भूषविले. बंडू भाऊ वैरागडे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
हिंगणा - सती माता मंदिर बाजार चौक रायपुर हिंगणा येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतीमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विभागीय उपाध्यक्ष विदर्भ महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज विशाल बांदरे, हिंगणा तालुका एरंडेल तेली समाज अध्यक्ष भावेश कैकाडे, जेष्ठ समाजसेवक मारोतरावजी पारडकर, अरुण कैकाडे,
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे आराद्य दैवत राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आज सकाळी ११ वाजता प्रतिमेचे पुजन उस्मानाबाद जिल्हयाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,उस्मानाबाद नगरी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले