१ एप्रिल अमरावती : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने खा. रामदास तडस व विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबागेट परिसरातील विट्ठल मंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १२७ दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व पार पाडले
३ एप्रिल अमरावती : प्रा.स्वप्निल खेडकर हे 10 वर्षापासून समाजामध्ये काम करत असतांना त्यांनी युवा वर्गासाठी केलेले वेगवेगळे सामाजिक उपक्रम प्रेरणादाही ठरत आहे. नेहमी समाजासाठी जनजागृती करत त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. कोरोना काळात नुकताच संताजी जगनाडे महाराज विषयी प्रश्नमंजुषा तयार करून घर घरात संताजी महाराजांची ओळख निर्माण व्हावी हा स्तुत्य उपक्रम घेतला. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी अनेक संघटना मध्ये काम करत असतांना आपली एक ओळख निर्माण केली. कुठलाही भेदभाव न करता समाज एकत्र कसा येईल यासाठी विशेष प्रयत्न ते करत आहे.
धुळे - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासमा प्रदेशाध्यक्ष मा. खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात हमाल, शेतमजूर, शेतकरी व गोरगरिख नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच यावेळी मास्क व सॅनिटायझरचे वाटपही गरिब नागरिकांना करण्यात आले.
तेली समाजामध्ये खान्देशात सामाजिक सेवा देणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा लवकरच " समाज सारथी " पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. लवकरच या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल. समाजाच्या तळागाळापर्यंत सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यामध्ये " समाज सारथी " पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल
अमरावती : जयभारत मंगल कार्यालय येथे मराठा-तेली समाज विकास मंडळाद्वारे आयोजित शिक्षकांचे स्नेहसंमेलन नुकताच पार पडले. मराठा-तेली समाजात अनेक शिक्षक असले, तरी त्यांना एकमेकांचा प्रत्यक्ष परीचय नाही. त्यामुळे शिक्षकांचेपण संघटन निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. संजय तिरथकर यांनी केले.