मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित (मराठा, तिळवन, लिंगायत) तेली समाज उप वधु-वर परीचय मेळावा आयोजित करण्याचे ठरविले होते, परंतु कोरोनाचे वाढते प्रमाण व नव्यानेच शासनाने जाहीर केलेली नियमावली लक्षात घेता हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मेळावा न घेता, मोजक्याच समाज बांधवाच्या उपस्तिथीत बंध नात्याचे वार्षिक २०२२
अक्कलकुवा - अक्कलकुवा येथील फर्स्ट आईडिया इंटरनेशनल स्कूल मध्ये संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतीथी साजरा करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतीथी पर साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा नंदुरबार जिल्ह्याचे उपाध्यक्ष भानुदास चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले.
औरंगाबाद : गारखेड्यातील चौंडेश्वरी मंदिरात औरंगाबाद तेली समाजातर्फे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. आ.अतुल सावे, अनिल मकरिये, नीलेश सोनवणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हभप प्रभाकर बोरसे महाराज, हभप स्नेहलता खरात, लक्ष्मी महाकाळ यांनी मनोगते व्यक्त केली.गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.
परभणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या रथयात्रेचे नांदेड विभागीय सचिव पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडेश्वर ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताश्या, फटाके फोडून व महिला मंडळींच्या वतीने दीपोत्सव साजरा करून स्वागत केले. यावेळी दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९-०० ते १००० श्री भीमाशंकर गुरुजी यांचे प्रवचन आयोजित केले होते,
परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे महाराष्ट्र राज्य किशोरव किशोरी गट राज्य कबड्डी स्पर्धा झाली. या स्पर्धेत पुणे जिल्हा संघाची कर्णधार व निगडी येथील नवनगर ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाची खेळाडू धनश्री तेली हिने अष्टपैलू खेळ करत चौफेर चढाया व उत्कृष्ट पकडी करीत पुणे जिल्हा संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. तिची २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२२ दरम्यान उत्तराखंड येथे होणान्या राष्ट्रीय किशोर व किशोरी गटाच्या कबड्डी स्पर्धेसाठी