नि:शुल्क नोंदणी- जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्थेतर्फे तेली समाजाच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय ( वधु - वर परिचय ) असलेल्या 'सुयोग' विदर्भ स्तरीय पुस्तकांसाठी नावे नोंदणी नि:शुल्क सुरू झालेली आहे. दररोज कार्यालयीन वेळेत ( ११ ते ६ ) सिव्हिल लाइन्स व नंदनवन येथे पासपोर्ट साइझ 02 फोटो जोडून फॉर्म भरून दि.10-05-22 पर्यंत दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेतानी Pdf मध्ये दिलेला फार्म भरुन पाठवून द्यावा.
जालना - श्री संताजी जगनाडे महराजांच्या कृपेने अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गत रविवारपासून ( ता. १७ ) सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता रविवारी ( ता. २४ ) होत आहे.
तेली समाज संघर्ष समिती स्थापन होवून गुडीपाडव्याला १ वर्ष पुर्ण झाले आहे. त्या निमित्य कार्यकर्ता परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचे सुनिश्चित झाले आहे. त्या निमित्याने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ०९/४/२०२२ वेळ - सकाळी ११.०० वाजता स्थळ : संताजी भवन, उषा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती. येथे करण्यात आलेले आहे.
अकोला येथे साहू तेली समाज द्वारा आयोजित माॅ कर्मा जयंती उत्सव व महाप्रसाद कार्यक्रम आय एम हॉल मध्ये संपन्न झाला. यावेळी समाजातील विविध संघटनांचे मान्यवर तसेच राज्य तेली समाज समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश डवले सर, सरचिटणीस प्रशांत शेवतकर सर , जिल्हा परिषद अकोला चे माजी अध्यक्ष आदरणीय बालमुकुंदजी भिरड , प्रतिष्ठित नागरिक रमेशजी गोतमारे, श्रीजी ट्यूशन क्लासचे संचालक अनीलजी वानखडे, माजी मनपा गटनेता योगेशजी गोतमारे, प्राध्यापक विजयजी थोटांगे, प्रा विकासजी राठोड,
अमरावती : स्थानिक बडनेरा रोड स्थित जयभारत मंगल कार्यालयात मराठा ,देशकर , तिळवन, लिगांयत, तेली समाजाच्या "बंध नात्याचे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे उदघाटक माजी पालकमंत्री जगदीशभाऊ गुप्ता व प्रमुख अतिथी म्हणुन माजी महापौर अशोकराव डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.