अर्धापूर - प्रदेश तेली महासंघाची नांदेड विभागातील आढावा बैठक मंगळवार, दि. २८ रोजी दु. १२ वा. हॉटेल विसावा पॅलेस शिवाजीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत तेली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ओझर तालुका जामनेर येथे मागील पंधरवड्यात वादळी पाऊस झाला त्या पावसामध्ये आपल्या तेली समाजातील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. घरांची पडझड झाली शेतकऱ्यांचे पीकांचे व गुरेढोरे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तेथील नुकसानग्रस्त शेतकर्यांची चर्चा करून त्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी खानदेश तेली समाज मंडळ प्रयत्न करीत आहे.
चंद्रवदन बाबुराव चौधरी उर्फ आबासाहेब यांचे नाव ऐकताच नजरेसमोर कानुमाता व सप्तशृंगी देवीचे चित्र उभे राहते. शिरपूर येथील रहिवासी असलेले आबासाहेब यांचे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.सप्तशृंगी माता व कानु मातेचे अनेक गाणे त्यांनी स्वतः लिहून त्याचे चित्रीकरण केले आहे.अनेक सुप्रसिद्ध गाणे व कॅसेट आबासाहेबांच्या नावावर आहेत.नुकतेच तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी, संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजांवर देखील त्यांनी गाण्यांचे चित्रीकरण केले आहे.
7 एप्रिल अमरावती - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती व यवतमाळ विभागा द्वारे आयोजित रेषीमगाठी वार्षिक 2021 तेली समाज उपवर - वधु पुस्तक प्रकाशन हा कार्यक्रम, शंकरराव हिंगासपुरे यांच्या राहत्या घरी नुकतेच करण्यात आले. रेषीमगाठी वार्षिक 2021 या तेली समाज उपवर-वधु पुस्तिकेचे विमोचन खा. रामदास तडस व उपस्थित मान्यवराचे हस्ते करण्यात आले.
एैतिहासिक व स्वातंत्र लढ्याचा वारसा लाभलेल्या देवळी नगरीतील रामदास तडस यांनी लाल मातीतील पहेलवान ते दोन वेळा आमदार व दोन वेळा खासदारकी पटकावून दिल्ली पर्यंत धडक मारली आहे. स्वभावातील नम्रपणा व कुणालाही मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांचा हा प्रवास सहज शक्य झाला आहे. एकीकडे वर्धा जिल्ह्यातील राजकारणात प्रस्थापिताची दाणादाण झाली असतांना सामान्य कुटुंबातील रामदास तडस यांचा राजकारणातील चढता आलेख सर्वांना अचंबित करणारा ठरला आहे.