लोहारा : जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग, इंद्रायणी नदीत बुडवलेल्या गाथा पुन्हा मिळवून लिहून काढण्याचे काम संत संताजी जगनाडे महाराजांनी केले. तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकी एक होते. दोघांची कर्मगाथा, जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते. संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे संत तुकारामांचा पट्टशिष्य, महाराष्ट्रातील तेली समाज घडविणारे
मुदखेड, दि. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासन परिपत्रकानूसार शहरातील मुदखेड तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये
साजरी करण्यात आली. येथील तहसीलदार सुजीत नरहारे यांच्या सूचनेनुसार तहसील कार्यालयात सकाळी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक जनार्दन पिन्नलवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील कोपर्ली या गावी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व प्रदेश तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी. यावेळी कोपर्ली गावात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली निघाली.
श्री संताजी समाज विकास संस्था अध्यक्ष - प्रा. संजय वा. आसोले (राष्ट्रपती पदक सन्मानीत) संपर्क कार्यालय - प्लॉट नं. ८, कलोती नगर, श्री नंदराज यादव यांचे घरासमोर जुना बायपास रोड, दस्तुर नगर परिसर, अमरावती. (मोबा. : ९२८४६६९८८१) फॉर्म स्वीकारण्याची अंतीम तारीख : २५ डिसेंबर २०२२ अधिक माहिती साठी संपर्क प्रा. संजय आसोले (9420720499) श्री. रमेशपंत शिरभाते श्री. मिलींद शिरभाते (9284240345)
अमरावती जिल्हा तैलिक समिती, अमरावती व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अमरावती विभाग व्दारा सर्वशाखीय तेली समाज उप वधू-वर परिचय मेळावा व 'रेशीमगाठी' कुर्यात सदा मंगलम् पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ सर्व शाखिय तेली समाज बांधवाना सुचित करण्यात येत आहे की, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अमरावती विभाग व अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाखिय उपवर वधुवर परीचय मेळावा आयोजित केलेला आहे.