Sant Santaji Maharaj Jagnade
दि. १४ : देगलूर तालुक्यातील तेली समाज कार्यकारी संघ या नोंदणीकृत संस्थेस देगलूर नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या चार गुंठे भूखंडावर तेली समाजाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संताजी जगनाडे सांस्कृतिक सभागृहाच्या कंपाऊंड वॉलचे गेट व बांधकामाचा शुभारंभ देगलूरनगरीचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार व तेली समाजाचे उपाध्यक्ष डॉ. अमितकुमार देगलूरकर यांच्याहस्ते संपन्न झाला.
छत्रपती संभाजीनगर येथे तेली समाजाच्या वतीने संताजी चौक एन २ सिडको, राजीव गांधी नगर येथे आभिवादन करण्यात आले. संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष राधाकिसन सिदलंबे हे होते.
संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजपरिवर्तन शक्य - प्रा. विजय गवळी यांचे प्रतिपादन श्रीसंत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमगडचिरोली : भारत ही संतांची भूमी असून प्रत्येक समाजामध्ये संत आहेत. त्या संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजात परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगरचे (औरंगाबाद) संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विजय गवळी यांनी केले.
अकोला - संताजी सेना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांनी विषद केलेल्या मुळ तुकारामगाथेचे लेखनिक श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात शुक्रवारी प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संताजी महाराजांची ३९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीच्या निमित्ताने धुळे महानगरातील राजवाडे बँके जवळ असलेल्या गुरु शिष्य स्मारकातील श्री संताजी महाराज व तुकाराम महाराज