मुर्तिजापुर तालुका सर्व शाखीय तेली समाज बांधव तर्फे आयोजीत शहरात प्रथमच श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्रावर आधारीत अडीच तासाचा धार्मिक नाट्यप्रयोग सादर होत आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांच्यामुळे आज जगाला ज्ञान देण्याकरिता उपलब्ध आहेत, असे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावरील जिवंत देखावा नाट्यस्वरूपात जनतेला पहावयास मिळणार आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा अकोला विभागाचा विभागीय मेळावा , ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, अकोला येथे दिनांक 7 एप्रिल 2023 शुक्रवार ला संपन्न झाला. सदर मेळावा विभागीय अध्यक्ष विष्णुपंत मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली तर विभागीय सचिव रमेशराव आकोटकार, अकोला जिल्हा अध्यक्ष दीपकराव ईचे , बुलढाणा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाखरे,
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, अकोला विभागातील सर्व आघाडयांचे अध्यक्ष तथा सचिव (जिल्हा व तालुका) यांचा विभागीय मार्गदर्शन मेळावा तथा विभागीय व जिल्हा महिला पदग्रहण सोहळा आयोजीत करण्यात आला ला आहे. तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या समाज बांधवांचा गुणगौरव पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला - 'समाज संघटित असणे गरजेचे आहे, संघटनशक्ती समाजासाठी वापरा,' असे आवाहन आमदार रामदास आंबटकर यांनी केले. राज्य तेली समाज समन्वय समितीचा वधू वर परिचय मेळावा शनिवारी प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते.
अकोला : राज्य तेली समाज समन्वय समितीचा वधू-वर परिचय मेळावा शनिवारी येथील प्रमिलाताई ओक सभागृह येथे आनंदात झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामदास आंबटकर हे उपस्थित होते. राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजन समितीचे प्रा. प्रकाश डवले, प्रशांत शेवतकर, बालमुकुंद भिरड, डॉ. पूजा धांडे,