छत्रपती संभाजीनगर येथे तेली समाजाच्या वतीने संताजी चौक एन २ सिडको, राजीव गांधी नगर येथे आभिवादन करण्यात आले. संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष राधाकिसन सिदलंबे हे होते.
गडचिरोली : भारत ही संतांची भूमी असून प्रत्येक समाजामध्ये संत आहेत. त्या संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजात परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगरचे (औरंगाबाद) संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विजय गवळी यांनी केले.
अकोला - संताजी सेना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांनी विषद केलेल्या मुळ तुकारामगाथेचे लेखनिक श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात शुक्रवारी प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संताजी महाराजांची ३९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीच्या निमित्ताने धुळे महानगरातील राजवाडे बँके जवळ असलेल्या गुरु शिष्य स्मारकातील श्री संताजी महाराज व तुकाराम महाराज
धामणगाव रेल्वे : राज्यातील संतपरंपरेत मानाचे स्थान असलेले आणि संत तुकारामांच्या महान गाथेचे पुनर्लेखनातून पुनरुज्जीवन करणारे संत जगनाडे महाराज यांच्याविषयी अद्याप पाठ्यपुस्तकांमध्ये धडा नाही वा त्यांच्या नावे कोणतेही विकास मंडळ नाही.