अखिल भारतीय साहू वैश्य महासभा के 31वे वाषिक दिवस पर अखिल बुंदेलखंड साहू वैश्य महासभा का गठन किया गयाट जिसमें सर्व-सम्मति से संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व सद्गुरु विश्वरुप मिशन नई-दिल्ली मा. डॉ. जगन्नाथ साहू जी एवं राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशचंद्र साहू राहुल एडवोकेट द्वारा बुंदेलखंड प्रांत प्रांत के पदाअधिकारियों का मनोनयन किया
स्वातंत्र्य सैनिक दगडू अंतू क्षिरसागर :- भिंगारची वेश ही एक इंग्रजांचे दडपशहीचे केंद्रबिंदू होते. याचजवळ क्षिरसागरांचे घराणे उगवत्या सुर्याला साक्ष ठेऊन रोज आरेरावीपणा जूलुम व अन्याय पहावा हे ठरलेले होते. जी काही तरूण मन महात्मा गांधीच्या विचाराने जागृत झाली त्यांपैकी प्रमुख हा एक या मातीचा आवाज हेता. आशावेळी भिंगारच्या स्वातंत्र्य सैनिकानी ठरवले. ब्रिटिश राजवटीला हादरा देऊ. त्यातील एक भाग म्हणुन नगरच्या सरोज टॉकीजमध्ये बॉम्ब ठेवु आणी ही राजवट खीळ-खीळी करू. या सर्व कामात क्षिरसागर सहभागी होत. 6 महिने जेलमध्ये चक्की पिसत होते. बुलेटिन वाटणे चळवळ उभी करणे ही कामे केलीच. पैकी क्षिरसागर हे एक त्यांनी दारूबंदी व इतर लढे उभे केले. 1932 मध्ये दारू दुकान बंदी करण्यास सत्याग्रह झला. फौजदार अरेरावी करू लागला. त्यावेळी ब्रिटीश फौजदाराला क्षिरसागर यानी मारहाण केली. त्याचा परिणाम 21 दिवस शिक्षा झाली. नहीं रखना नहीं रखना ! ये जालिम सरकार नहीं रखना ! हा एक नारा होता. हा एक मातीचा आवाज होता. करू किंवा मरू हा एक संदेश होता.
रेल्वेची लाईनच बंद करावयाची 1/2 कि.मी. रेल्वे रूळांना ग्रीस लावले. आणि ही इंग्रजांची यंत्रणा ही बंद पाडली. इंग्रजी संस्कार देणारी व स्वातंत्र्याला धोका देणारे संस्कार दणारे पी.टी. हायस्कुल तेव्हा होते. एकमध्यरात्री त्या हायस्कुललाच आग लावली. व इंग्रजांची फोडा नीती भस्मसात केली. 1818 साली शनीवारवाड्यात इंग्रजांनी फोडा व झोडा नितीचा वापर करुन युनियन जॅक फडकवला. त्या इंग्रजांच्या कारभाराच्या जागा शासकीय इमारती त्यावर युनियन जॅक फडकत असे. श्री. कर्पे यांनी सोबत्यांना घेऊन युनियन जॅक उतरवुन तिरंगा फडकवीला. याबद्दल अंगावर वळ उमटले तरी मारहाण इंग्रजांनी केली. पण तरी त्यांनी कबुली दिली नाही. आणि बाहेरच्या सोबत्यांची नांवे सागितली नाही. आनंदाने एक वर्ष शिक्षा भोगली.
भिंगार हा नगरचा भाग मोगल काळातही मोगलांचे केंद्र व ब्रिटीश काळातही भिांगर कॅम्प ही इंग्रजांची शक्ती. गावाच्या वेशीजवळ तेलाचे घाणे. घाण्यातले तेल विक्रीसाठी लगेच बाहेर दुकाने. दुकान तरी कसले ढिगा सारखी ठेवलेली पेंड. पातेल्यात तेल संपले इंग्रज अधिकारी येणार पैसे न देता माल नेणार उलट बंदुकीचा धाक. काशिनाथ नामदेव देवकर हा नामदेव देवकरांचा मुलगा. त्या तरूण रक्ताला हे खटकल. गावातील तालमीत येजा त्यात ब्रिटीश विरोधी सुर दिसुन आला. हा जाच आपलाच नाही तर हा जाच या देशाला आहे. आणी तो दुर करण्यास धडपड चालु आहे. ते यात सामिल झाले.
नगरमधील अकोला दुर्गम भाग. अकोला मधील राजुर हे अती दुर्गम. या गावात समाज बर्यापैकी भाऊशेठ पाबळकर हे जागृत बांधव.तेलघानी बारा महिने नसे. इतर वेळी दारातील चार जनवरे डोंगरात घेऊन जावे. दुध मिळे. हे कितीतरी पिढ्या चालले. जुलूमी इंग्रजांनी जंगलेच सरकारी ठरवली. गायरानात बंदी आणली. हा कायदा भंग करण्यास क्रांतीसिंह नाना पाटील यांनी गांधींच्या आदेशावर चरणबिळाशी (सांगली) येथे जंगल सत्याग्रह केला. त्याचे पडसाद येथे ही उमटले. राजूरच्या युवकांनी 1930 मध्ये जंगल सत्याबग्रह करून इंग्रजांच्या कार्याचा भंग केला. त्याबद्दल इंग्रजांनी शिक्षाही दिली. परंतु या जुलूमी राजवटीविरुद्ध जागो जागी बुलेटिन वाटणे, वाचून दाखविणे, आदिवासी लोकांना स्वातंत्र्याचे महत्व सांगणे यात हे आघडीवर होते.