स्वातंत्र सेनानी शंकरराव धावडे एक स्वातंत्र सेनानी गोवा मुक्ती अंदोलनाच्या काळात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सह लढणारे समाज बांधव. मुंबई सह महाराष्ट्र झालाच पाहिजे या चळवळीतले म्होरके यासाठी अनेक वेळा तुरूंगात जावे लागले. कामगार व शेत मजुर यांच्या हाक्का साठी आयुष्यभर रस्त्यावर लढत राहिले. त्यातुन अनेक प्रश्न मार्गी लागले.
पारतंत्र्य म्हणजे गुलामगीरी ही सामाजीक, आर्थीक, सांस्कृतीक व राजकीय असु शकते. गुलामाला गुलामगीरीची जाणीव झाली की तो काय करू शकतो याचे जीवंत उदाहरण म्हणजे अस्तगांव, जि. नगर येथील स्वा. सैनिक तुकाराम हरिभाऊ गाडेकर हे होत. त्यांचे अप्रकशित आत्मपरिक्षण हस्तलिखीत स्वरूपात मिळाले ते त्यांचे चिरंजीव काशिनाथ तुकाराम गाडेकर यांनी मला प्रकाशित करण्यास परवानगी दिली.
१९४२ सालच्या स्वातंत्र्य लढ्यात महादेव बांदेकर सहभागी झाले होते. या वेळी त्यांना सात महिने करावासही झाला होता. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांनी बांदेकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहुन कुटूंबीयांचे सांत्वन केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कदम, तलाठी नलावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
समाजा बद्दल प्रेम असल्याने ते कार्यालयात असत. सुदूंबरे संस्थेत ते सहभाग घेत १९६१ च्या प्रलयंकारी महापुराच्या वेळी पुरग्रस्थाना मदत केंद्रात सक्रीय होते. त्यांचे चिरंजीव श्री. विजयकुमार शिंदे हे तिळवण तेली व या संस्थेचेे माजी अध्यक्ष आहेत. तसेच संताजी उत्सवाचे अध्यक्ष ही होते.
शनी महाराज त्यांचे मुळ नाव क्षिरसागर, मला नंतर कळाले ते एक स्वातंत्र सेनानी होते इंग्रज यांना शनी म्हणत या माणसाची साडेसाती त्यांना झोंबत होती. त्यांनी इतकी दहशत इंग्रजा विरूद्ध त्यांनी निर्माण केली होती परंतु स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात संसार उध्वस्त झालेल्या या बांधवांनी समाज कार्यालयात राहुन समाजाची सेवा केली.