सह्याद्री पर्वताचे उंच शिखर कळसुबाई ते याच भागात सर्वात दुर्गम भाग तो हाच याच अकोले तालुक्यात राजुर हे क्रांतीचे केंद्र इंग्रजांची बारीक नजर एक अटक करावा तर दुसरे दोन निर्माण व्हावेत अशी, अवस्था दत्तात्रय पन्हाळे हे तरूण वयात देश सेवेने भारावून गेले. जंगलातील भूमिगतांना संरक्षण देणे. भाकरी पोहच करणे, प्रभात फेरी व सायंकाळी फेरी काढणे सुरू केले. इंग्रजाच्या वाकड्या नजरेने ते भुमीगत झाले. इंग्रजांची यंत्रणा उडवुन टाकण्यस तारा तोडल्या, भुमिगतांना पकडू नये म्हणुन पूल उडवून टाकले. यातुन 9 महिने शिक्षाही झाली. शिक्षा संपल्या नंतर बुलेटिन वाटणे, जागोजागी सभा घेणे सुरू ठेवले. या वेळी अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, दुर्वे नाना यांचा परिचय यामुळे स्वातंत्र्य यज्ञात काम करता आले.
संगमनेर हे इंग्रजांचे सर्व तर्हेचे केंद्र होते. महात्मा गांधीच्या मुळे हळु हळु वारे चांगलेच जोर धरत होते. 1930 चा लढा हा गावो गावी झाला संगमनेर याबबत आघडीवर जंगल सत्याग्रह हा कायदे भंग इंग्रजांचा एक तडाखा होता. यात वालझाडे यांचा सहभाग होता. संगमनेरच्या युवकांनी 1936 मध्ये ब्रिटिश राजवटी विरूद्ध एक कट तयार केला आणि तो राबविला सुद्धा या कटाच्या सुत्र धारांपैकी ते एक. तो आखणे व प्रत्यक्ष राबविणारे म्हणन त्यांना अटक व शिक्षा झाली. 1942 च्या लढ्ात भूमिगत राहुन इंग्रज राजवट खिळखिळी करीत होते.
1942 मध्ये महामा गांधींनी करेंगे या मरेंगेचा संदेश दिला. भारत छोडो ही गर्जना नगरच्या तेली खुंटावर दिली. तेली खुंट हा नगरच्या मध्यवर्ती परिसर. ही गर्जना नगर शहराल पसरली. अनेक स्वातंत्र्सैनिकांच्या ग्रुप्त बैठका दारूणकर यांच्या येथे होत. रोज सकाळी प्रभात व सायंकाळ सायंफेरी दारूणकर सोबत्यांना बरोबर घेऊन काढत असत. हातात तिरंगा व मुखाने नही रखनी नही रखना यह जालिम सरकार नही रखना हा आवाज उमटु लागला. इंग्रजांचे लक्ष दारूणकरांच्या कडे वळले. त्यांनी साम, दाम, दंड यांचा वापर केला. परंतु आवाज बंद होत नव्हता. उलट तिरंगा घेऊन ते इंग्रजांना सळो की पळो करीत होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना आटक केली. येरवडा जेल मध्ये रवानगी केली. या ठिकाणी एस.एम.जोशी, आच्युतराव पटर्वशन या सारख्य बरोबर शिक्षा भोगताना त्यांना आनंद होत होता. सहा महिण्याची शिक्षा भोगल्या नंतर त्यांनी सावध राहुन गुप्त पणे स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवला.
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 3) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
कोणताही धर्म अमानवता शिकवत नाही. तरी आपली हुकमत ठेवण्यासाठी, आपली आर्थीक सुबत्ता येण्यासाठी धर्माचे ठेकेदार हे खोटा देव खोटा धर्म स्वत: उभा करतात हा आज पर्यंतचा इतिहास आहे. गतवर्षी बारामती येथील कुटूंबालीत साठी गाठलली माता आक्रोश करीत होती. माझी लग्नाला आलेली मुलगी धर्माच्या ठेकेदाराांच्या कळपात अडकली ती बारामती, फलटण, गोवा मार्गे पनवेलच्या अश्रमात अडकली जन्मादात्या आईला ही ती आई म्हणण्यास तयार नाही. संबंधीत संभाषण करू देत नसतील तर ही गुलामीची पाऊल वाट आहे. कोणत्या ही हिंदू धर्म ग्रंथात आईला आईम्हणु नकोस असे शिकवलेले नाही. पण स्वातंत्र्यात ही धर्म मार्तंड तेच उदयोग करित असतील तर स्वातंत्र्यात आपण कुणाचे गुलाम बनु पहाल आहोत.
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भ्ााग 1) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
शैक्षणीक स्वातंत्र्य, धनसंचय स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य सामाजीक स्वातंत्र्य, शेवटी राजकीय स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असेल तर माणुस माणुस म्हणुन जगु शकतो. देवाचा जो अभास करून भव्य दिव्य उभे केले जाते. त्यात माणसाचे मोठे पण दाखवले जाते. यापेक्षा अतीउच्च स्वातंत्र्य. संत जोगा परमानंद यांच्या कडे जाण्यापुर्वी यादव कालिन एक प्रसंगाची तोंड ओळख मांडतो. तेली समाजाच्या मतावर निवडूण गेलेल्या मा. फडवणीस यांनी बाबासाहेब पुरंदरे या नावाच्या ब्राह्मण्याला प्रतिष्ठा देऊन इतरांना तुच्छतेत ठेवणार्याला महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला. त्यांचे शिवचरित्र डोळस पणे पाहिले तर समजुन येईल त्यांनी शिवाजी राजांना स्वातंत्र्यासाठी मदत करणार्या मध्ये बारा बलुते आलुते व दलित आशा एकशे चव्वे चाळीस मंडळीं साठी एका हाताच्या बोटावर मोजता येणार नाही एवढी पाने खर्च केली नाहीत. परंतू ब्राह्मण्याचे उदात्तीकरण कण्यासाठी शेकडो पाने खर्च केलीत.