Sant Santaji Maharaj Jagnade
About Teli
पूर्वीच्या काळी तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना 'तेली' या संज्ञेने उल्लेखले जाई. तेली समाज हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पसरलेला आहे. आज जगाच्या प्रत्येक भागात समाजातील बांधव उपस्थित आहेत. तेली समाज हा भारतीय प्रजासत्ताक जनगणनेनुसार इतर मागास वर्गीय समाजात मोडला जातो.
पुणे :- श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे अध्यक्ष श्री जर्नादन गोपाळशेठ जगनाडे कळवितात की. दि. 8/1/2016 या दिवशी सुदंबरे येथे श्री. संताजी समाधी स्थळी पुयतिथी सपन्न होईल. तसेच दुसर्या दिवशी काल्याचे किर्तन होऊन दरवर्षी प्रमाणे संस्थेची जनरल सभा होईल.
स.पी. उबाळे यांनी एक स्मरणीका दिली त्यावरून समजले त एक सिद्धी जानणारे ग्रहस्थ होते. मोठे पण शिष्य परंपरा या पासुन ते दुर होत. यांचे नाव ही त्यांनी कुणाला सांगीतले नवहते. मग कोणत्या गावाचे हे दूरच आहे. बाबांनी आपल्या अध्यात्मीक जोरावर अनेक बाबी सिद्ध केल्या होत्या. एक दर्शक बाबा म्हणुन अनेक जण सांगतात. त्यांचा जो प्रसिद्ध फोटो आहे त्यावरून हे तेली बाबा हे महाराष्ट्रातील नसावेत कारण त्यांचा फेटो साक्ष देतो.
सातारा शहराजवळ अरफळ नावाचे गाव आहे. या ठिकाणी काळोजी महाराजांनी समाधी घेतली आहे. अनेक दशके या ठिकाणी छोट्या प्रमाणात समाधी दिन साजरा होत होता. परंतु सातारा जिल्हा समस्त तेली समाज या संस्थेने त्यात लक्ष दिले आणि दर वर्षी जिल्हा स्तरावर समाधी सोहळा संपन्न होत आसते. या साठी संस्थेचे पदाधीकारी व मार्गदर्शक श्री जयसिंगराव दळवी लक्ष देतात. आरफळ जवळ जरंडेश्वर डोंगरावर हनुमानाचे मंदिर आहे.
संत संताजींचे पहिले भाष्याकार कै. कृष्णाजी नारायण वैरागी यांनी काही पुरावे देऊन हे सर्व स्पष्ट मांडले आहे. आज ही चाकण येथे पिड्यान पिड्या जगनाडे परिवार आहे. देहू व सुदूंबरे हे अंतर 4/5 कि.मी. आज ही आहे. संत तुकारामांनी मला नक्की काय करायचे याचे चिंतन सुदूंबरे परिसरात केले आहे. सुदंबरे हे संताजीच्या मामाचे मुळ गाव. या गावात आज ही मामांचे वशंज काळे कुटंबीय आहेत. त्यामुळे संत संताजींचा वावर जास्त करन याच ठिकाणी असावा या विचार धारेला अधीक पुष्टी मिळु शकते.