Sant Santaji Maharaj Jagnade
मुंबई :- बृहन्मुंबई तिळवण तेली समाज, मुंबई या उपरोक्त संस्थेच्या वतीने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २२ फेब्रु २०१५ रोजी दुपारी १.०० वा. म्युनिसिपल स्कुल सभागृह ना. म. जोशी. मार्ग, डिलाईल रोड, मुंबई - ४०००११ येथे आयोजित करण्यात आला.
समाजातील गोरगरीब जनतेसाठी काम करणारा, त्यांना आपले म्हणुन समाजात काम करणारा समाजसेवक यांची समाजाला गरज आहे. समाजात अनेक संघटना काम करतात परंतु समाजाची गरज ओळखुन कार्य करणे गरजेचे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी कार्य न करता समाजातील गरजु घटक केंद्र बिंदु माणून कार्य करणे गरजेचे आहे.
पुणे - टिळक कट्टर ब्राह्मण्यवादी होते. ते समतावादी नव्हते. याचे जीवंत उदाहरण म्हणजे त्यांनी अथनी येथील जाहिर सभेत सांगतीले तेल्याना तेल काढायला विधी मंडळात जायचे का कुणब्याना नांगर धरायला ? याच दरम्यान राजर्षी शाहु यांनी उपेक्षीता साठी आरक्षण प्रणाली राबवली. त्याच शाहू महाराजा विरुद्ध टिळकानी संघर्ष केला. त्याच्या पुर्ण जीवन चरित्रात त्यांनी कुठेच तेल्या साठी काही केले असा उल्लेख नाही.
विखुरलेला समजाबद्दल सुदूंबरे येथे उत्सवात किंवा समाजाच्या मिटींग किंवा कार्यक्रमात माईक वर बरेच बोलतात परंतु ही बोलणारी मंडळी प्रत्यक्ष समाजासाठी काही करितच नाही. मी एक कामगार चळवळीतुन आलो असल्याने यांची बोलाची कडी मनाला पटत नाही. वेळ प्रसंगी प्रवाहाच्या विरोधात ही जावुन मी मते मांडत आसतो.
चाकण :- संत संताजी तेली संस्थेच्या उद्घाटक पदी प्रविण धोत्रे यांची निवड झाली. सुदूंबरे येथे संस्थेची वार्षिक सभा झाली या वेळी सर्वानुमते श्री. प्रविण धोत्रे यांची उद्घाटक पदी निवड झाली.