गुप्ता युवा फाउन्डेशन कलवा तेली समाज दिवा द्वारा संचालित रविवार दिनांक १६ फरवरी २०२० माता कर्मा जयंती- तेली समाज महासम्मेलन २०२० भक्त शिरोमनि माता कर्मा देवी के आशिर्वाद एवम् समाज के परस्पर सहयोग से माता कर्मा देवी की १००४ वी जयंती पर पूजा तथा महाप्रसाद और तेली महासम्मेलन का आयोजन किया गया है ।
तेली महासंघाने उचलली मागणी
नागपूर मराठा समाजाला राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण जाहीर करताच आता तेली समाजानेदेखील दहा टक्के आरक्षणाची मागणी पुढे केली आहे. मराठा समाजाप्रमाणेच तेली समाजदेखील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे तेली इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास (टीईबीसी) असा नवा प्रवर्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे मुख्य संयोजक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. -
तेली समाज मंडळ जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली
कणकवली तेली समाज उन्नती मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची तर सचिवपदी चंद्रकांत तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच येथील वृंदावन हॉलमध्ये झाली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, मधुकर बोर्डवकर, अप्पा तोटकेकर, आबा तेली, नंदू आरोलकर व इतर पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्हातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात भव्य राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजा तर्फे कराड शहरात लिंगायत तेली समाजासाठी राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, उत्कर्ष प्रगती व्हावी त्यांचे वैभव वाढावे हाच एक ध्यास आणी त्यानिमित्ताने एकमेकांना भेटावे स्नेह वाढवावा, वृध्दिगंत व्हावा नवीन स्नेह संबंध जुळावेत, त्यासाठी खात्रीशीर व्यासपीठ मिळावे हे ध्येय बाळगून हा भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन करीत आहोत.
जय संताजी तेली समाज सेवा संस्था (चेंबूर, उपनगर) या संस्थेच्या वतीने या वर्षी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी व स्नेह संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२० रोजी सायं. ४.३० ते ८.३० वा. या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटूंब सहपरिवारासह कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आलेली आहे.