Sant Santaji Maharaj Jagnade
सुमारे २१ कुटुंबीयांची कुलदेवता. सुमारे २५० वर्षांची परंपरा नित्यपूजा, नवरात्रौ उत्सव, प्रतिवर्षी पाडवा नववर्ष - देवरुप - श्रीफळ बदल, भट वाढणे, गणेशोत्सव गोकुळाष्टमी, नवरात्री उत्सव, त्रैवार्षिक तिसाल उत्सव इ.
येथील सुमारे ५० वर्षांपासून अस्तित्वाला असलेले देवगड बाजारपेठेतील श्रद्धास्थान - उपासना केंद्र मंडळाचे माजी पदाधिकारी श्री. वसंतराव मुणगेकर बंधूंचे हे संपूर्ण मालकीचे मंदिर परिसरातील सर्वांचे मानसिक विश्रांती स्थान आहे.
मालवणमध्ये देऊळवाड्यातील तेलीवाडीत भाद्रपद महिन्यात गौरी विर्सजन कार्यक्रम संपल्यावर रात्रौ वाडीतील सर्व कुटुंबे एकत्र येऊन गौरीच्या नैवेद्यासाठी बनविलेल्या भाकरी आणि शेवग्याची भाजी करतात ती एकमेकांना वाटतात. सर्व इष्ट, मित्रमंडळी व तेली कुटुंबे नैवेद्यम्हणून स्नेहभोजनाचा समारोह गेली कित्येक पिढ्या साजरा करत आहेत.
श्री देव कलेश्वर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला
श्री देव कलेश्वराचा इतिहास जूना असला तरी त्याचे कागदोपत्री बऱ्याच वेळा नावे बदलली गेली असे दिसून आले येथील वेंगुर्ला गावी तेली समाजाचा विस्तार पहाता पूर्वी सगळ्यात माेठा समाज वेंगुर्ला ग्रामी होता असे असले तरी आजची वस्ती हि किरकोळ दिसून येते. पूर्वीच्या काळी आजची भूजनागवाडी येथील श्री देव कलेश्वर मंदिर हे तेली समाजाचे श्री देव कलेश्वर मंदिर म्हणून प्रसिध्द होते. वस्तूस्थिती अशी आहे की त्या मंदिराचे खरे नाव कुळकार देवस्थान म्हणूनच होते.
देवगड तालुक्यातील हिंदळे येथील तेली समाज बांधवांचे दैवत श्री भवानीमातेचे हिंदळे राणेवाडी येथेमंदिर आहे. येथे दर तीन वर्षांनी श्री देवी भवानी मातेचा गोंधळ उत्सव असतो. या उत्सवासाठी हजारो तेली बांधव उपस्थित असतात. मुंबईकर