Sant Santaji Maharaj Jagnade
राज्यस्तरिय लिंगायत तेली समाज विधवा विधूर घटस्फोटीत व अपंग वधूवर पालक परिचय व स्नेह मेळावा तसेच समाजाचा विकासात्मक दृष्टीकोन विचारात घेवून समाजातील लोकांना संघटीत करून समाजाचे प्रश्न व अडचणी सोडवणेचे दृष्टीने समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ जि. पुणे. मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. 18 डिसेंबर 2019 ते 25 डिसेंबर 2019. अखंड हरिनाम सप्ताह
संगमेश्वर तेली समाज सेवा संघ, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने, रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी, सकाळी १०.०० वा. संगमेश्वर तालुका तेली समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये तेली ज्ञाती समाजाच्या तालुका नुतन दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण आणि महिला हळदीकुंकू होणार आहे. तरी सर्व समाज बांधवानी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा ही विनंती करण्यात आलेली आहे.
वरवेली - गुहागर तालुक्यातील वरवेली येथे तेली समाजाचे दैवत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती वरवेलीग्रामपंचायत. जिल्हा परिषद शाळा, श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे संपन्न झाली. यावर्षी प्रथमच शासन आदेशानसार शासकीयनिमशासकीय कार्यलयात श्री संत संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेश आल्याने सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पालघर सल्गन श्री संताजी जगनाडे सेवा मंडळ विरार वसई पालघर, पालघर युवा मंच पालघर डहाणु बोईसर वाणगांव आयोजित राष्ट्रसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. 08/12/2019 रोजी संध्या. ६ वाजता पालघर येथील कॉंग्रेस भुवन हॉल मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.