लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (4) लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे.
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.
लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत हा द्रविडीयन वंश आहे.लिंगायत जैन , बौद्ध शीख ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे. लिंगायत ही इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर बनविणारी एक धर्म प्रकिया आहे. लिंगायत हे लिंगांगसमरस्याचे षडस्थल तत्वविज्ञान आहे. लिंगायत हा जीव शिव यांच्यामध्ये एकात्मता साधणारा शिवसंस्कार व शिवयोग आहे. लिंगायत हे अष्टवरणाला भक्तिमार्ग पंचाचराला कर्ममार्ग आणि षडस्थलाला ज्ञानमार्ग मानणारे आचारशास्त्र आहे. लिंगायत हे आचारशास्त्र हिंदुपेक्षा स्वतंत्र, पूर्णतः वेगळे , भिन्न आहे.
लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (3) लिंगायत हिंदू नाहीत, लिंगायत वीरशैव नाहीत, लिंगायत स्वतंत्र धर्मिय आहेत.
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.
वैदिक हिंदू धर्माचे संस्कार आणि बसवादी शरणांच्या लिंगायत धर्माचे संस्कार, नियम पुर्णतः एकमेकांपासून वेगळे आहेत. वीरशैव आणि हिंदू पंचसुतक, वर्णव्यवस्था मानतात. लिंगायत पंचसुतक,वर्णव्यवस्था मानत नाहीत. लिंगायतानी एकेश्वरवाद जपला आहे याउलट वीरशैव किंवा हिंदूंनी बहुदेवतावाद जोपासला आहे. हिंदूचे व्रत-वैकल्य, उपवास, सण-समारंभ लिंगायतानी अमान्य केले आहे. लिंगायत वेद , पुराण, पंचांग, वास्तुशास्त्र किंवा कोणतेही शास्त्र मानत नाहीत. हिंदू किंवा वीरशैव हे सर्व मानतात. वीरशैव धर्म आहे असे कागदपत्री सिद्ध होत नाही, याउलट तो धर्म नसून मत आहे असे अर्थाचे सिद्धांतशिखमणी ग्रंथात श्लोक आहेत.
लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (2) वीरशैवीकरण म्हणजे लिंगायतांचे ब्राह्मणीकरण
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.
वीरशैवमताचे प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणजे सिद्धांतशिखमणी. सिद्धांतशिखमणीत 5-6 श्लोकात वीरशैव मत असा उल्लेख आला आहे. सिद्धांत शिखमणीत लिंगायत धर्म उल्लेख नाही. वीरशैव मत म्हंटले आहे धर्म कोठेच नाही. मत ही वेदातील काही ऋचा वर आधारित असतात. मत हे धर्म होऊ शकत नाही. दगडातून कोण जन्म घेईल, हे विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध करता येत नाही. जर पंचाचार्य दगडातून जन्मले तर आत्ता का जन्म घेत नाहीत. सिद्धांतशिखमणीतील भरपूर गोष्टी या ऋग्वेदातील काही भागावर, उपनिषदे आणि आगम यावर आधारित आहे.
लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (1) वैदिकांचे पाश, सामाजिक बांधिलकी आणि सिंहावलोकन
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.
जंगलाचा राजा म्हंटला जाणारा सिंह प्रत्येक पाच पाऊलानंतर मागे वळून पाहतो . आज लिंगायत समाजाने पण सिंहावलोकन करण्याची गरज आहे. लिंगायतांच्या इतिहासाची पाऊले पुसणारी काही वैदिक भटावळ तयार होत आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने लिंगायत धर्म आज पेच प्रसंगात सापडलेला दिसतो, वैदिक व्यवस्थेचे आक्रमण मोठ्या प्रमाणावर आजही लिंगायतावर होत आहे. लिंगायत धर्माची तत्वज्ञान आणि आचारसुत्रे याचा बारकाईने अभ्यास करून आज समाजाने समजून घेणे खूप गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकी जपताना काही अंशी लिंगायत आपल्या तत्वज्ञानाला मुरड घालताना दिसत आहेत.
राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017
गुरूवार दि. 2 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 ते सायं 6 वाजेपर्यंत
मेळाव्याचे ठिकाण -
शहीद फ्लाईंग ऑफीसर समीर काशिनाथ नेरकर नगर, वैकुंठवासी ह.भ.प. माधवराव बबनराव अंबिके सभागृह
शुभम गार्डन,
वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे - 411033
संपर्क कार्यालय व फार्म स्विकारण्याचा पत्ता
संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड
द्वारा - प्रदिप सायकर, सायकर प्लाझा, नगर अर्बन बँकेच्या खाली, चिंचवडगांव, पुणे 33
संपर्क 9156586402