Sant Santaji Maharaj Jagnade
रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था
कोकणस्थ तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा 2018
कार्यालय - आनंदभुवन, आयशर आयटी पार्क जवळ, अॅग्रीक्लचर बस स्थानक,
जयभवानी नगर, वागळे इस़्टेट, ठाणे 400 604
वधु - वर मेळावा रविवार दिनांक 28/1/2018 वेळ सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत.
मेळाव्याचे ठिकाण - ठाणे महानगर पालिका माध़्यमिक शाळा, किसन नगर नं.3, वागळे इस़्टेट, ठाणे - 400604
लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (5) अल्पसंख्याक धर्ममान्यतेचे फायदे
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.
लिंगायत धर्म अल्पसंख्याक दर्जा मिळेल. लिंगायत धर्म अल्पसंख्याक शाळा काढण्याचा अधिकार मिळेल. तंत्र व व्यवसाय शिक्षणसाठी कमी व्याजदरात शासनाकडून कर्ज मिळेल. कलम २९ व ३० नुसार धर्म, लिपी, भाषा, संस्कृती याचे जतन केले जाईल. धार्मिक स्थळे, बसवकल्याण, कुडलसंगम, आळते, बसवन बागेवाडी या स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारचा निधी मिळेल. लिंगायत संस्कृती आणि शरणांच्या स्थळांचे रक्षण केले जाईल. लिंगायत विद्यार्थी विध्यार्थीनिंना स्वतंत्र वसतिगृह मिळतील. संस्थांना धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी दिलेले दान करमुक्त असेल.
लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (4) लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे.
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.
लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत हा द्रविडीयन वंश आहे.लिंगायत जैन , बौद्ध शीख ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे. लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे. लिंगायत ही इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर बनविणारी एक धर्म प्रकिया आहे. लिंगायत हे लिंगांगसमरस्याचे षडस्थल तत्वविज्ञान आहे. लिंगायत हा जीव शिव यांच्यामध्ये एकात्मता साधणारा शिवसंस्कार व शिवयोग आहे. लिंगायत हे अष्टवरणाला भक्तिमार्ग पंचाचराला कर्ममार्ग आणि षडस्थलाला ज्ञानमार्ग मानणारे आचारशास्त्र आहे. लिंगायत हे आचारशास्त्र हिंदुपेक्षा स्वतंत्र, पूर्णतः वेगळे , भिन्न आहे.
लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (3) लिंगायत हिंदू नाहीत, लिंगायत वीरशैव नाहीत, लिंगायत स्वतंत्र धर्मिय आहेत.
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.
वैदिक हिंदू धर्माचे संस्कार आणि बसवादी शरणांच्या लिंगायत धर्माचे संस्कार, नियम पुर्णतः एकमेकांपासून वेगळे आहेत. वीरशैव आणि हिंदू पंचसुतक, वर्णव्यवस्था मानतात. लिंगायत पंचसुतक,वर्णव्यवस्था मानत नाहीत. लिंगायतानी एकेश्वरवाद जपला आहे याउलट वीरशैव किंवा हिंदूंनी बहुदेवतावाद जोपासला आहे. हिंदूचे व्रत-वैकल्य, उपवास, सण-समारंभ लिंगायतानी अमान्य केले आहे. लिंगायत वेद , पुराण, पंचांग, वास्तुशास्त्र किंवा कोणतेही शास्त्र मानत नाहीत. हिंदू किंवा वीरशैव हे सर्व मानतात. वीरशैव धर्म आहे असे कागदपत्री सिद्ध होत नाही, याउलट तो धर्म नसून मत आहे असे अर्थाचे सिद्धांतशिखमणी ग्रंथात श्लोक आहेत.
लिंगायत एक स्वतंत्र धर्म भाग (2) वीरशैवीकरण म्हणजे लिंगायतांचे ब्राह्मणीकरण
लेखन: श. अभिषेक श्रीकांत देशमाने, सांगली. ९८२२०५४२९१.
वीरशैवमताचे प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणजे सिद्धांतशिखमणी. सिद्धांतशिखमणीत 5-6 श्लोकात वीरशैव मत असा उल्लेख आला आहे. सिद्धांत शिखमणीत लिंगायत धर्म उल्लेख नाही. वीरशैव मत म्हंटले आहे धर्म कोठेच नाही. मत ही वेदातील काही ऋचा वर आधारित असतात. मत हे धर्म होऊ शकत नाही. दगडातून कोण जन्म घेईल, हे विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध करता येत नाही. जर पंचाचार्य दगडातून जन्मले तर आत्ता का जन्म घेत नाहीत. सिद्धांतशिखमणीतील भरपूर गोष्टी या ऋग्वेदातील काही भागावर, उपनिषदे आणि आगम यावर आधारित आहे.