तेली समाज संघर्ष समिती स्थापन होवून गुडीपाडव्याला १ वर्ष पुर्ण झाले आहे. त्या निमित्य कार्यकर्ता परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचे सुनिश्चित झाले आहे. त्या निमित्याने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ०९/४/२०२२ वेळ - सकाळी ११.०० वाजता स्थळ : संताजी भवन, उषा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती. येथे करण्यात आलेले आहे.
शंबुक - संताजी - डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंच संस्थेचे संस्थापक, पुरोगामी विचारवंत, लेखक, आमचे आधारस्तंभ दिवं. मा. मधुकरराव वाघमारे यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन !
आदरणीय वाघमारे साहेब चार वर्षापूर्वी आमची साथ सोडून गेलेत ...
दिनांक २७-३/२०२२ रोजी रविवारला मौज सोनापूर ता चामोर्शी येथे "श्री संताजी सहकारी पतसंस्था गडचिरोली जिल्हा"या पतसंस्थेच्या नोंदणीसाठी कुठलीही पूर्वसूचना नसतांना गावकरी बंधूची अचानक सभा घेण्यात आली. या सभेत अवघ्या अडीच ते तीन तासात सुमारे ४० ते ४५ सजग व सूज्ञ नागरिकांनी श्री संताजी सहकारी पतसंस्थेची रीतसर नोंदणी केली व आमच्या पतसंस्था निर्मिती कार्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा राज्य स्तरीय सर्वशाखीय तेली समाज उपवधु - वर व पालक परिचय मेळावा तथा स्नेहीबंध पुस्तकाचे प्रकाशन - तेली समाज सर्व शाखेतील वधु - वर व पालक परिचय मेळावा व "स्नेहीबंध' परिचयपत्र पुस्तीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व समाज बांधवाच्या उपस्थितीत आयोजीत केला आहे. सदर कार्यक्रम कोरोना निबंधाच्या अधिन राहुन अल्प उपस्थितीमध्ये घेण्यात येणार असल्याने आपणास या कार्यक्रमाची ऑनलाईन लिंक या सोबत देण्यात आलेली आहे.
संत जगनाडे महाराज चौक संताजी स्मारक या ठिकाणी सिंधुताई सपकाळ यांना संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे आदरांजली देण्यात आली या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने उपस्थित जवाहर वसतिगृहाचे अध्यक्ष श्री रमेश गिरडे, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेचे संस्थापक श्री अजय भाऊ धोपटे प्रभाग 27 चे लोकप्रिय नगरसेवक हरीश डीकोंडावार संताजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष श्री रुपेश तेलमासरे महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक श्री मंगेश साकरकर,