महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ह्या भूमीतच संत एकनाथ,संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नरहरी सोनार,संत नामदेव, संत निवृत्तिनाथ, संत मुक्ताबाई, संत समर्थ रामदास, संत रोहिदास, ह्या व इतर बऱ्याच संतांनी आपल्या विचारांनी आणि साहित्यांनी समाजाला प्रेरणादायी अशी शिकवणूक दिली.
चंद्रपूर : लोकशाहीची यशस्वीता नागरिकांच्या सक्रियतेवर अवलंबून असते. भारतातील तेली समाज राजकारणापेक्षा व्यापारउदीमला महत्त्व देतो. लोकशाहीतील सजग नागरिक म्हणून तेली समाजाने धाडसाने राजकारणात सक्रिय झाले पाहिजे, असे प्रतिपादन विदर्भ तेली समाज महासंघाचे तालका उपाध्यक्ष गोविल मेहरकुरे यांनी केले.
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ द्वारा आयोजित तेली समाजातील सर्व शाखीय उप वधुवर मुला-मुलींची परीचय पुस्तिका “शुभ मंगलम” चे प्रकाशन रविवार दि. २३ जानेवारी २०२२ , वेळ : सकाळी ११ वा. स्थळ : श्री संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
नागपूर : श्री संताजी स्मारक समितीद्वारे संत जगनाडे चौक नंदनवन नागपूर येथे ८ डिसेंबरला मोठ्या उत्साहात श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. जगनाडे महाराज यांचा ३९७ वा जन्मोत्सव ब्रह्ममुहुर्तावर सकाळी ६ वा. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. यशवंत खोब्रागडे व डॉ. गणेश मस्के यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पंचामृताने स्नान करून विधिवत पूजा करण्यात आली.
गडचिरोली : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.अनेक संतांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले. संत संताजी जगनाडे महाराजांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी आहेत. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला, असे प्रतिपादन विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर यांनी केले.