संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य महासभेचे पुरुष आघाडी युवा आघाडी व महिला आघाडी पदाधिकारी आज झालेल्या कार्यक्रमामध्ये सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले व संताजी जगनाडे महाराज भव्य रथयात्रा चे तत्परतेने स्वागत करून पादुका दर्शन सोहळाचा लाभ घेत संताजींना अभिवादन केले.या कार्यक्रमात संताजी ब्रिगेड तर्फे चहा माक्स व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला
भंडारा : श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पालखी व संत तुकाराम महाराजांच्या गाथा दर्शन सोहळा भंडारा येथील शुक्रवारी वार्डातील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात संपन्न होऊन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
चामोर्शीः संत जगनाडे महाराजांचे जन्मगाव सदुंबरे, पुणे येथून निघालेल्या श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज तेली समाज जोडो अभियान व रथयात्रेचे चामोर्शी शहरातील तेली समाज बांधवांनी जंगी स्वागत केले. याप्रसंगी रथयात्रेसोबत आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पादुकाचे विधीवत पुजन करण्यात आले. याप्रसंगी संजय कुनघाडकर,
तेली समाज संस्था, बाराभाटी / रेल्वे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम दिनांक ०२ जानेवारी २०२२ रोज रविवारला स्थळ:- गंगाधरजा दशमुख याच्या घरासमोर व समाज मंदीराच्या भव्य आवारात सर्व तेली समाज बांधवाना निमंत्रित करण्यात येते की, तेली समाज संघटना,बाराभाटी च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम आयोजित केला असून उपरोक्त कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
पुसद : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज याची पालखी रथ यात्रा व प्रांतिक संघटनेचे नेते हे यवतमाळ येथे दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी गुरुवारला सायंकाळी ६.०० वाजता प्रथमागमन करणार आहेत. या पालखी रथाचे व अतिथी नेत्याचे स्वागत लोहारा येथील श्री कमलेश्वर महादेव मंदिरात भव्य स्वरूपात करण्यासाठी समाज बांधवानी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे यवतमाळ पालखीचा व समाज नेत्यांचा मुक्काम संताजी मंदिर येथे राहील.