महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर असलेली अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वर वधू सुचक मंडळाच्या माध्यमातून नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नुकतेच रजु झालेले डॉ. विपिनजी इटनकर यांचा सत्कार अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी समाजाचा वर वधु मेळावा घेतल्यास माझ्या कडून मदत करून मला बोलवल्यास निश्चितच होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहील.
चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर, गुणवंत गौरव समारंभ २०२२, स्थळ - श्री संताजी वस्तीगृह, मुल रोड, रेंजर कॉलेज समोर, चंद्रपूर, दिनांक रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ ला दुपारी २.०० वाजता, तेली समाजातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वर्ष २०२१२०२२ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास सर्वान उपस्थिती रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे.
माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे तैलिक गौरव पुरस्काराने सन्मानित
गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांची सामाजिक सेवा या श्रेणीमध्ये तैलिक गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. संताजी सांस्कृतिक भवन, सोमवारी क्वार्टर बुधवार बाजार, सक्करदरा नागपूर येथे १२ जुलै रोजी युवा फाउंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने तैलिक समाजबांधवांचा महामेळावा व तैलिक गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विदर्भ तेली समाज महासंघ महिला आघाडी चंद्रपूर शहर अध्यक्षा सौ. चंदाताई मनोज वैरागडे यांची फिनिक्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्या बाबूपेठ येथे ५०० महिलांच्या बचतगट चालवीत असून या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना स्वरोजगार व मुलांच्या शिक्षमासाठी अर्थसहाय्य केले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
भिसी : विदर्भ तेली समाज महासंघ तालुका चिमूरची बैठक भीसी येथे तालुकाध्यक्ष ईश्वरजी हुकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत तेली समाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली व तालुका कार्यकारिणी बनविण्यात यावी असे ठरविण्यात आले. बैठकीला बाळूभाऊ पिसे, भास्करराव बावनकर, विलासराव बन्डे, प्रभाकर पिसे, पितांबर पिसे, संजय कामडी, उमेद्र भलमे, गितेश तळेकर,