नांदगांव पेठ- 8 डिसेंबरला संत जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचे शासनाचे आदेश असल्याने सोमवारी अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने नांदगांव पेठ येथील सर्व शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायतला संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
नागपुर तेली समाज - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन येथे संताजी महाराज यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभे च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करूण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन पुजा अर्चणा केली.
.
हिंगणा - सती माता मंदिर बाजार चौक रायपुर हिंगणा येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतीमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विभागीय उपाध्यक्ष विदर्भ महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज विशाल बांदरे, हिंगणा तालुका एरंडेल तेली समाज अध्यक्ष भावेश कैकाडे
गडचांदूर - स्थानिक नगर परिषदेच्या बिर्ला हॉलमध्ये संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी ८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जयंती साजरी करण्याचे दिशा निर्देश देण्यात आले.
गडचांदूर (ता.प्र.) - गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक संताजी जगनाडे महाराज चौकात प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोकराव बावणे यांनी भूषविले. बंडू भाऊ वैरागडे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.