श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबई - शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना 2020
दि. 17-10-2020 दरवर्षी आम्ही हे प्रसिद्धीपत्रक छापील स्वरूपात महाराष्ट्रातील प्रत्येक सामाजिक संस्थांना पोस्टाने अथवा कुरियरने जुलै महिन्यातच पाठवत असतो. यावर्षी आलेल्या कोविड-19 च्या आपत्तीमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे हे पत्रक आपणांस उशिरा व अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देत आहोत.
चंद्रपूर :- अखिल भारतीय तेली समाज संघटना प्रणित वधूवर सूचक मंडळ चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष पदी बल्लारपूर येथील प्राध्यापिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. विना संजय झाडे यांची नियुक्ती अखिल भारतीय तेली समाज संघटन व वर वधू सूचक मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय दिलीपजी चव्हाण, मुख्य सचिव सचिनजी देशमाने व अन्य पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
हिंगोली, ता. १३ : सेनगाव शहरातील तेली समाजातील एका व्यक्तीच्या मृतदेहाची अवहेलना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याठिकाणी अंत्यविधीला विरोध म्हणून जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याची माहिती मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी दिली असून याबाबत रविवारी (ता.१३) एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव शहराजवळ तेली समाजाची स्मशानभूमी आहे.
मेहकर : संताजी कॉन्व्हेंटमध्ये महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा घाटावरील कार्यकारिणी व महिला घाटावरील कार्यकारिणों गठीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे व महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र ही तर संतांची खाणच आहे. येथे संतांची मोठी श्रृंखला आहे. संतांनी सर्व जातीत जन्म घेऊन भगवद् भक्तिच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे जीवापाड प्रयत्न केले. शैव, वैष्णव, सगुण, निर्गुण अशा सर्व सामंजस्य प्रकारच्या संत परंपरा विकसित केल्या. केंद्र बिंदु पंढरपूर असून विठ्ठलाच्या नामस्मरणात भजन, किर्तन करीत लाखोंच्या संख्येने पंढरीची वारी ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.