चांदूर बाजार, ११ डिसेंबर - संत परंपरेतील श्रेष्ठ संत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे तैलचित्र सर्वच शासकीय कार्यालयात लावावे, या मागणीचे निवेदन तैलिक समजाच्या शिष्टमंडळाने तहसीदार उमेश खोडके यांना देऊन त्यांना संताजी माहराजांची प्रतिमाही भेट दिली.
भारतातील अन्य राज्यात तिनी समाजाचा समावेश आरक्षणाच्या भटक्या विमुक्त जातीत करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला भटक्या विमुक्त जाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे. या मागणीला घेऊन नागपूर येथील अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र तेली समाजाचे नेते संजय कुंभारकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
चंद्रपुर मूल तेली समाज - येथील बजाज शोरूमसमोर संत संताजी. जगनाडे महाराज जयंती माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, अनिल मोगरे, दादाजी येरणे, नगरसेविका रेखा येरणे, शांताराम कामडे, डॉ. गोकुल कामडी, विजय भुरसे, विनोद आंबटकर आदी उपस्थित होते.
चंद्रपूर ब्रम्हपुरी दि. ११ - महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाचा भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्या वतीने १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे सकाळी १० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे यात तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तेली समाजाच्या एकतेची ताकत दाखवावी असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा.श्याम करंबे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या अख्यातरीत येणाऱ्या सर्वच शासकीय कायालयात श्रीसंताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत परिपत्रक निघाले. त्याअनुशंगाने सर्व शासकीय कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंतीचा कार्यक्रम व्हावा, यासाठी महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा, महिला आघाडीन पुढाकार घेतला आहे. श्रीसंताजी जगनाडे महाराज जयंती शासकीय/ निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबतचे परिपत्रक आणि प्रतिमा भेट देण्याचे कार्य समाजाने हाती घेतले आहे.