चंद्रपुर - सर्व तेली समाज बांधवांना विनंती करण्या आसली आहे की तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती महोत्सव दि. 7 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2019 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 8 डिसेंबर रोजी रविववार दुपारी 4 वाजता, स्थळ श्री हनुमान मंदिर जय बजरंग क्रिडा संकुल च्या बाजुला, जुनोबा चौक बापुपेठ, चंद्रपुर, येथ तरी सर्व तेली समाज बांधवानी जास्ती जास्त संख्यने उपस्थित राहावे आसे आव्हान करण्यात आलेले आहे.
प्रयत्न, निष्ठा प्रामाणिक असेल तर यश हमखास मिळते : अक्षय गुल्हाने यूपीएससी परीक्षेत देशात प्रथम; कोषटवार विद्यालयात सत्कार
पुसद 'प्रयत्न आणि निष्ठा प्रामाणिक असल्यास हमखास यश मिळते. यूपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षामध्ये यश मिळविण्यासाठी योग्य नियोजन, व्यावहारिक नीती कौशल्य व योग्य दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे. ध्यास आणि अभ्यास यातूनच यशोगाथा रचता येते', असे मनोगत यूपीएससी च्या ड्रग्ज इन्स्पेक्टर (मेडिकल डिवाइसेस) या परीक्षेत भारताचा अव्वल आलेल्या अक्षय दिनकर गुल्हाने यांनी व्यक्त केले.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे या संस्थेच्यावतीने तेली समाजातील, सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता १० वी मध्ये ८५ टक्के आणि इयत्ता १२ वी मध्ये ७० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या (उदा. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू इत्यादी) विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार दि.२४ डिसेंबर २०१९
संताजी स्नेही मंडळ, तालुका चामोर्शी चे वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती, निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम, दिनांक 0८ डिसेंबर २०१९ (रविवार) दुपारी १.०० वाजता, स्थळ : बाजार चौक, नगरपंचायत, चामोर्शी, अध्यक्ष - मान. प्रा. विलास निंबोरकर, गडचिरोली, प्रमुख वक्ते मान. प्रविनदादा देशमुख, सुप्रसिद्ध वक्ते, यवतमाळ (विषय : शेतीचे अर्थकारण, सरकारी धोरण व ओबीसी आरक्षण), किर्तनकार मान. इंजि. भाऊसाहेब थुटे , प्रसिद्ध प्रबोधनकार तथा सप्तखंजेरी वादक, वर्धा (सत्यपाल महाराज यांचे शिष्य)
चंद्रपुर - ब्रम्हपुरी तेली समाज वधु - वर परिचय मेळावा, प्रबोधन व सत्कार मेळावा 2019
श्री संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ ब्रम्हपुरी, जि. चंद्रपुर च विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत तेली समाज वधू - वर परिचय, प्रबोधन व सत्कार मेळावा 2019, कार्यक्रम स्थळ विठ्ठल रूख्मिणी सभागृह, आरमोरी रोड, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपुर, कार्यक्रम दि. व वेळ 25 डिसेंबर 2019 बुधवार, सकाळी 11.00 ते 4.00 वा पर्यंत. तरी सर्व तेली समाज बांधवानी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती करण्यात आलेली आहे.