अधिकारीपदाधिकाऱ्यांची दांडी शासकीय, निमशासकीय कार्यालयातअन्य राष्ट्रसंताप्रमाणे श्री संत जगनाडे महाराजाची जयंती साजरी करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामुळे श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती कार्यक्रमाला अधिकारी, पदाधिकान्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. तरीही किन्हीराजा ग्रामपंचायतीचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे तेली समाजबांधवांमधून रोष व्यक्त केल्या जात आहे.
तेली समाज बुलढाणा डोणगाव : 8 डिसेंबर ग्रामपंचायत व सर्व शाळांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. रविवार ८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य डोणगाव येथील जिप कन्या शाळा, जिप मराठी प्राथमिक शाळा . शिवाजी हायस्कूल, मावा, पातरकर आणि ग्राम पंचायत येथे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
वाशिम तेली समाज मुंगळा, ता. ९ : संताजी महाराजांना कीर्तन, प्रवचन श्रावणानाच्या आवडीमुळे संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट १६४० साली झाली. संताजी महाराजांनी तुकाराम महाराजान गुरुस्थानी मानले होते. तुकाराम महाराजांची गाथा
चामोर्शी - जनसंख्येने मोठ्या प्रमाणात असलेला तेली समाज आजही सरकारच्या उदासीन धोरणामुळे अन्यायाने पिचला जात आहे. किंबहूना जेव्हा-जेव्हा ओबीसींचा विचार आला तेव्हा ते विचार दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. समाजाचा कणा असलेला तेली समाजबांधव व कुणबी यांचे अत्यंत हाल होत असून या बहुसंख्य समाजाला जनगणनेमध्ये स्थान नसावे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याने आतातरी संताजी जगनाडे महाराजांना स्मरून तेली समाजबांधवांनो आपल्या हक्कासाठी पेटून उठा,
युवारंग क्लब आरमोरी तर्फे श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त संत जगनाडे महाराज प्रतिष्टान आरमोरीची स्वछता करून जयंती साजरी करण्यात आली, प्रमुख पाहुणे म्हणून राहुलभाऊ जुआरे, प्रफुल मोगरे, रोहित बावनकर, रोशन दुमाणे, प्रफुल खापरे, अजय कुथे , अंकुश दुमाणे, नेपचंद्र पेलणे, फिरोज पठाण, रोशन मने, आशिष रामटेके, यादव दहिकार, अमोल दहिकार, सुरज पडोळे,अंकित बन्सोड, राकेश सोनकुसरे, संकेत तीतीरमारे, बंडावार साहेब आणि समस्त आरमोरी शहरातील समस्त नागरिक उपस्थित होते.