फुलसावंगी तेली समाज - फुलसावंगी येथील समाज बांधवाच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल व प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कारमोरे, प्रकाश वानखेडे उपस्थित होते. यावेळी संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल यांनी संताजी महाराज यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सवा निमीत्य नागपूर महानगरपालिका नागपूर येथे संत जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण व माल्यार्पण नागपूर महानगरपालिका च्या उपमहापौर सौ मनीषा ताई कोठे स्थाई समिती अध्यक्ष श्री प्रदिप पोहाने यांच्या हस्ते दिनांक ८ डिसेंबर १९ छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय इमारत नागपूर महानगरपालिका येथे सपन्न झाला.
चंद्रपूर दि. ०८ : सन २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि.८ डिसेंबर २०१९ रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. ज. पु. ति. २२१८/ प्र. क्र. १९५//२९ दि.२६ डिसेंबर २०१८ परिपत्र काढण्यात आले आहे.
अधिकारीपदाधिकाऱ्यांची दांडी शासकीय, निमशासकीय कार्यालयातअन्य राष्ट्रसंताप्रमाणे श्री संत जगनाडे महाराजाची जयंती साजरी करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामुळे श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती कार्यक्रमाला अधिकारी, पदाधिकान्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. तरीही किन्हीराजा ग्रामपंचायतीचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे तेली समाजबांधवांमधून रोष व्यक्त केल्या जात आहे.
तेली समाज बुलढाणा डोणगाव : 8 डिसेंबर ग्रामपंचायत व सर्व शाळांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. रविवार ८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य डोणगाव येथील जिप कन्या शाळा, जिप मराठी प्राथमिक शाळा . शिवाजी हायस्कूल, मावा, पातरकर आणि ग्राम पंचायत येथे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.