उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे "ह.भ.प. कै.विश्वनाथ आप्पा तेली समाज संघटना तेर" यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वैकुंठ धाम रथाची पुजा तेली समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथिल तेली समाज बांधवाच्या वतीने ह.भ.प. कै.विश्वनाथ आप्पा तेली समाज सेवाभावी संघटना शाखा तेर यांच्या वतीने वैकुंठ धाम रथाची पुजा उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.
सातारा शहर समस्त तेली समाज सातारा, यांचे वतिने सोमवार दि. 4/6/2018 रोजी. स्थळ - संगममाहुली सातारा येथे अधिक मासाचे काळा निमित्त श्री गंगापूजन व महाप्रसाद करण्यात येणाार आहे. कार्यक्रम सकाळी 9.30 ते11.30 गंगा पूजन विधी दुपारी 12.30 ते 2.30 महाप्रसाद, आयोजक सातारा शहर समस्त तेली समाज सातारा.
पंढरीत ओबीसी काँग्रेस व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाच्यावतीने भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप
पंढरपूर दि.२८ (वार्ताहर) - पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. दर्शनानंतर आलेल्या भाविकांना आपल्या गावाकडे जाताना त्यांचे तोंड गोड व्हावे म्हणून शनिवार दि.२८ जुलै रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात पंढरपूर शहर ओबीसी काँग्रेस व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्यावतीने लाडू प्रसादाचे वाटप
सोलापूर येथे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जनसुनावणी सुरू असताना तेथे महाराष्ट्र माळी समाजाचे ओबीसी नेते श्री. शंकरराव लिंगे हे ओबीसीचे निवेदन देण्यास गेले असताना तेथे उपस्थीत असलेल्या मराठा संघटनेच्या नेत्यांनी मारहाण केली.
सांगलीः अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय युवा कार्यकारिणीत विजय सकपाळ (बुधगाव) यांची निवड झाली. लखनौमध्ये कार्यकारणीत महाराष्ट्रातून त्यांची एकमताने निवड झाली. देशपातळीवर कार्यरत संघटना 106 वर्षे जुनी आहे. दिल्ली येथील तालकोट क्रीडांगणावर आयोजित तेली एकता कार्यक्रमात संकपाळ यांना अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.