वरवेली तेली समाज - तेली समाजोन्नती संघ तालुका चिपळूण व गुहागर संघाच्या वतीने तेली समजातील उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबीर बांधवांसाठी उद्योग व व्यापार मार्गदर्शन) दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. भगवती बॅकचेटस शंग्रीला कंपनीसमोर हॉटेल गोपालाजच्या मागे एल. बी. एस. मार्ग भांडुप (प) मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. तेली समाजातील काही यशस्वी उद्योजक आणि व्यापारी तसेच लघु उद्योग मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.
गेवराई तेली समाज :- संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या एकूण १४ टाळकांपैकी एक महत्त्वाचे टाळकरी होते. त्यांनी निरपेक्ष वृत्तीने व निस्सीम भक्तीने संत तुकाराम महाराज यांचे अभंग लिहून ठेवण्याचे व जतन करण्याचे महान कार्य केले.संघर्षाच्या काळात संताजी जगनाडे यांनी जगद्गुरु तुकोबाराय यांना साथ दिली.एव्हडे त्या दोघांत सख्य होते,असे प्रतिपादन प्रसिद्ध अभ्यासक विजय गवळी यांनी गेवराई येथे केले.
शिर्डी : संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्ताने व दि. १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवसाचे औचित्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स अहमदनगर जिल्हा व शिर्डी शहर तसेच शिर्डी शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेतर्फे १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा. श्याम करंबे यांनी केले आहे.
श्री संताजी समाज विकास संस्था अमरावतीच्यावतीने रविवार १५ डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुलामुलीचा परिचय मेळाव्याचे आयोजन व विवाहबंधन या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा खा. नवनित राणा, आ. रवि राणा, रमेशभाऊ गिरडे, माजीमंत्री जगदिश गुप्ता यांच्या उपस्थितीत होत आहे.